Jogeshwari East Assembly Election 2024 : जोगेश्वरी पूर्व हा मतदारसंघ नव्यानेच तयार करण्यात आला आहे. २००९ मध्ये झालेल्या मतदार संघ पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ तयार करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत या मतदारसंघावर शिवसेनेचं (संयुक्त) वर्चस्व राहिलं आहे. शिवसेनेचे रवींद्र वायकर सलग तीन वेळा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिवसेनेत फूट पडून पक्षाचे दोन गट पडल्यानंतर रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदेंच्या गटात जाणं पसंत केलं. मात्र, त्यामुळे जोगेश्वरमधील शिवसैनिकांमध्ये देखील फूट पडली आहे. दरम्यान, वायकर यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने वायव्य मुंबईतून तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत वायकरांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला आणि आता ते संसदेत गेले आहेत. वायकर लोकसभेवर गेल्यामुळे आता शिवसेनेचा शिंदे गट या मतदारसंघात नव्या उमेदवाराच्या शोधात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महायुतीचं अद्याप जागावाटप झालेलं नाही. वायकर लोकसभेवर गेल्यामुळे आता ही जागा मिळावी यासाठी शिवसेनेचा शिंदे गट व भारतीय जनता पार्टी आग्रही आहे. या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक व उत्तर-पश्चिम भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर हे दोघेही उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. २०१४ च्या निवडणुकीवेळी शिवसेना-भाजपाची पारंपरिक युती तुटली होती. त्यावेळी भाजपाने या मतदारसंघातून उज्ज्वला मोडक यांना उमेदवारी दिली होती. मात्र वायकरांनी त्यावेळी मोडक यांचा २८ हजार मतांनी पराभव केला होता. जोगेश्वरीवर शिवसेनेचं वर्चस्व असलं तरी या विधानसभा मतदारसंघात भाजपाचे तीन नगरसेवक आहेत. तसेच शिंदे गटाचे दोन नगरसेवक आहेत. मागील महापालिका निवडणुकीत भाजपाचे दोन नगरसेवक या मतदारसंघात अवघ्या काही मतांच्या फरकाने पडले होते. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये भाजपाचं या मतदारसंघात प्रस्थ वाढलं आहे. त्यामुळे भाजपा शिंदे गटाला सहजासहजी या मतदारसंघातून तिकीट देण्याची शक्यता कमी आहे.
शिंदे गट वायकरांच्या पत्नीला उमेदवारी देणार?
दुसऱ्या बाजूला, रवींद्र वायकर लोकसभेवर गेले असले तरी त्यांनी या विधानसभा मतदारसंघावरून नजर हटू दिलेली नाही. त्यांच्या पत्नीला या मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी मिळवून देण्यासाठी वायकर प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी या मतदारसंघात भाजपाचा आमदार व्हावा अशा आशयाचे पोस्टर्स ठिकठिकाणी लावले आहेत.
हे ही वाचा >> Andheri East Assembly Constituency : ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात महायुतीची ताकद पणाला, भाजपा-शिंदेंना आव्हान पेलणार का?
महाविकास आघाडीतली परिस्थिती काय?
जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जागेबाबत महायुतीत मतैक्य नसताना महाविकास आघाडीतही अद्याप नावनिश्चिती झालेली नाही. ठाकरे गटाचे बाळ नर व विश्वनाथ सावंत हे या जागेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसनेही या जागेवर दावा केल्याचं बोललं जात आहे. त्यांचे काही नेते जोगेश्वरीतून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. दोन्ही पक्षांकडून उमेदवारीवर दावा केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीनंतर जोगेश्वरीला नवीन आमदार मिळणार, हे मात्र नक्की आहे.
एकूण मतदारांची संख्या
या विधानसभा मतदारसंघात एकूण २,८९,८०५ मतदार असून त्यापैकी १,५७,८११ पुरूष मतदार आहेत, तर १,३१,९९४ महिला मतदार आहेत.
हे ही वाचा >> Shirdi Assembly Constituency: शिर्डी विधानसभा: विखेंचा गड यंदा ढासळणार की शाबूत राहणार?
मतदारसंघावर रवींद्र वायकरांची पकड
रवींद्र वायकर हे तीन वेळा येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्याआधी जोगेश्वरीमधून सलग चार वेळा (१९९२ ते २००९) नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. २००६ ते २०१० या काळात ते मुंबई महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्ष होते. वायकरांची जोगेश्वरीवर चांगली पकड आहे.
यंदा तिरंगी लढत
जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून एकूण २९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी एक अर्ज बाद करण्यात आला आहे, तर एक अर्ज मागे घेण्यात आला आहे. या मतदारसंघातून शिवसेनेने (ठाकरे) अनंत नर यांना तर, शिंदेंच्या शिवसेनेने खासदार रवींद्र यावकर यांची पत्नी मनीषा वायकर यांना उमेदवारी दिली आहे. येथे प्रामुख्याने अनंत नर विरुद्ध मनीषा वायकर यांच्यात सामना रंगणार आहे. यासह मनसेने भालचंद्र अंबुरे यांना उमेदवारी दिली आहे. पमेश्वर रानशूर (वंचित), विजय यादव (रासपा) येदेखील स्पर्धेत असतील.
ताजी अपडेट – वायकरांसाठी अवघड लढाई
जोगेश्वरी हा रवींद्र वायकरांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी या मतदारसंघात यंदा चुरस पाहायला मिळणार आहे. येथे शिवसेनेने (शिंदे) वायकरांच्या पत्नीला म्हणजेच मनिषा वायकरांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने (ठाकरे) अनंत नर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भालचंद्र अंबुरे यांना उमेदवारी दिली आहे. मनसेने देखील या मतदारसंघात जोरदार प्रचार केला आहे. मतदारसंघात मनसेमुळे महायुतीच्या मतांचं विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर काँग्रेसच्या मतांमुळे ठाकरेंच्या उमेदवाराची ताकद वाढली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात मतदान पार पडलं. राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढल्याचं चित्र आहे.मुंबई उपनगरांत ५५.७७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या मतदारसंघात मतदारांकडून संमिश्र प्रतिसाद होता. या मतदारसंघात मतदान केंद्रांची संख्या वाढवल्यामुळे लोकसभेप्रमाणे मतदारांची अडचण झाली नाही. रवींद्र वायकर, मनिषा वायकरांसह महाविकास आघाडीचे प्रतिनिधी सर्व मतदान केंद्रांवर जाऊन पाहणी करत होते. मतदारांची गैरसोय होणार नाही याची निवडणूक अधिकाऱ्यांकडून काळजी घेतली जात होती.