मुंबई : विधानसभा निवडणुकीत युती फिसकटल्याने मनसेने स्वबळावर निवडणूक लढवली. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच युती फिसकटली आणि त्याचा फटका अमित ठाकरे, संदीप देशपांडे यांना बसल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीत सामील होऊनच निवडणूक लढवावी, अशी मागणी मनसे नेत्यांकडून मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत राज यांनी पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीतील पराभव विसरून, नव्या दमाने कामाला लागण्याचा सल्ला दिला. विधानसभेत झाले ते विसरा आणि महापालिकेच्या तयारीला लागा, असा आदेश पदाधिकाऱ्यांना दिला. मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची जवळपास दीड तास बैठक पार पडली. या वेळी एकनाथ शिंदे यांच्या नकारघंटेमुळे मनसे महायुतीत गेली नाही, अशी भूमिका एका बड्या नेत्याकडून व्यक्त करण्यात आली.

man cut hair of young woman during train journey railway police arrest accused
रेल्वे प्रवासात तरुणीचे कापले केस, रेल्वे पोलिसांनी आरोपीला केली अटक
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Three months jail developers , Mumbai ,
मुंबईतील तीन विकासकांना तीन महिन्यांचा कारावास, महारेराच्या आदेशाचे पालन न केल्याने महारेरा अपलीय न्यायाधीकरणाचा निर्णय
Minister Pankaja Mundes clarification on Anjali Damanias allegations
बीडमधील अधिकारी मी नेमलेले नाहीत, आरोपांबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांचे स्पष्टीकरण
Dabholkar murder case Objection to Dabholkar familys appeal against release of accused
दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या सुटकेविरोधातील दाभोलकर कुटुंबीयांच्या अपिलाला आक्षेप
Suresh Dhas
Suresh Dhas : “…तर बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल, राजीनामा ही नंतरची गोष्ट”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं मोठं विधान
Santosh Deshmukh Murder Case
Devendra Fadnavis : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा
Seven lakh farmers deprived of loan waiver
सात लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

हेही वाचा – तक्रारदार महिलेला फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट? उच्च न्यायालयाचे तपास अधिकाऱ्यांच्या कृतीवर ताशेरे

हेही वाचा – सात लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

मतदारसंघांच्या आढाव्यासाठी समिती

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या बैठकीत मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी मनसेच्या नेत्यांची एक समिती तयार केली जाईल. ही समिती त्या-त्या प्रभागातील उमेदवारांचा आढावा घेईल. त्याचप्रमाणे युतीबाबतच्या निर्णयाच्या वेळी या समितीचे म्हणणे विचारात घेतले जाईल, अशी माहिती पुढे आली आहे.

Story img Loader