कल्याण परिसरातील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना घडली आहे. येथील एक उच्चशिक्षित तरुण डान्सबारमध्ये पैसे उधळण्यासाठी चक्क अट्टल घरफोड्या बनला आहे. आरोपीनं कल्याण परिसरात तब्बल आठ घरं फोडली आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपीचा शोध घेत बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून सुमारे २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

रोशन जाधव असं आरोपीचं नाव असून तो डोंबिवलीतील निळजे गावातील रहिवाशी आहे. आरोपी तरुण हा उच्चशिक्षित असून त्याने पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आहे. त्याने काही वर्षे एका मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रात कामही केलं आहे. आरोपीनं कल्याण परिसरात एकूण ८ गुन्हे केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे.

हेही वाचा- नागपूर: शाळकरी मुलीवर शिक्षकाकडून अत्याचाराचा कळस, ४ महिन्यांपासून सुरू होतं विकृत कृत्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाला डान्सबारमध्ये पैसे उधळण्याची सवय लागली होती. ही हौस पूर्ण करण्यासाठी त्याने दिवसा ढवळ्या घरफोडी करायला सुरुवात केली. त्याने अलीकडेच कल्याण परिसरात भरदिवसा घरफोडी केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ४८ तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी एकूण ८ गुन्हे उघडकीस आणत ४७ तोळे सोन्याचे दागिने, एक लॅपटॉप, एक मोबाईल फोन आणि दोन घड्याळे असा २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Story img Loader