पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्या प्रकरणात छोटा राजनला विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणात सीबीआयने न्यायालयात दिलेल्या माहितीत जे. डे यांची हत्या का झाली याचा उलगडा झाला. जे. डे एका पुस्तकाचे लिखाण करत होते. या पुस्तकातून डे बदनामी करणार, अशी माहिती राजनला पुरवण्यात आली. तसेच डे यांच्यामुळे जिवाला धोका होऊ शकतो, अशी भीतीही घातली गेली. यातूनच राजनने डे यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले होते.

जे. डे हत्या प्रकरणात ऑगस्ट २०१६ मध्ये सीबीआयने छोटा राजनविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. यात छोटा राजन जे. डेंवर का भडकला होता आणि त्याने हत्या का केली याचा उलगडा झाला होता. जे. डे हे त्यावेळी दोन पुस्तकांचे लिखाण करत होते. ‘चिंधी रॅग्ज टू रिचेस’ असे या पुस्तकाचे नाव होते. या पुस्तकात अंडरवर्ल्डमधील २० गँगस्टरचा समावेश होता. अंडरवर्ल्डमध्ये चिंधी या शब्दाचा वापर एखाद्या गुन्हेगाराला कमी लेखण्यासाठी किंवा त्याचा अपमान करण्यासाठी केला जायचा. या पुस्तकातून जे. डे हे राजनचा खरा चेहरा समोर आणणार होते. राजनने देशप्रेमाचा खोटा मुखवटा समोर करुन स्वत:चे रक्षण केले आणि त्याच्या कुटुंबासाठी कोट्यवधींची संपत्ती गोळा केली, असा जे. डे यांचा दावा होता, असे सीबीआयचे म्हणणे होते.

kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची तयारी : ‘जीएस’ची तयारी
21st edition of the third eye asian film festival started in mumbai
चित्रपटसृष्टीत लेखकांना अपेक्षित श्रेय मिळणे आवश्यक; गीतकार, सिनेलेखक जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
Loksatta book batmi John Baxter Paris
बुकबातमी: जॉन बॅक्स्टरचे पॅरिस…
Oxford and Cambridge in England West Side in Chicago rowing boat
जगणे घडविणारे वल्हारी…
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून
ulta chashma
उलटा चष्मा: असला भुसभुशीतपणा नको!

जे. डे हे आणखी एका पुस्तकाचे लिखाण करणार होते. यात ते दाऊदचा तस्करीपासून ते अंडरवर्ल्ड डॉनपर्यंतचा प्रवास लिहिणार होते. एकही गोळी न झाडता दाऊदने अंडरवर्ल्डमध्ये स्वतःचे वर्चस्व कसे निर्माण केले, यावर ते लिहिणार होते. अंडरवर्ल्डमधील २० ‘चिंधी’वरील पुस्तकातील काही भाग उघड झाला होता. ही माहिती मिळताच छोटा राजनने पुस्तकाचे प्रकाशन थांबवण्यासाठी जे. डे यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, जे. डे त्यांच्या दबावासमोर झुकले नाही. याऊलट त्यांनी छोटा राजनविरोधात बातम्या देणे सुरुच ठेवले. हाती घेतलेल्या दोन पुस्तकांचे लिखाण पूर्ण झाल्यावर जे. डे पत्रकारिता क्षेत्रातून निवृत्त होणार होते. एप्रिल ते मे या कालावधीत ते पुस्तकानिमित्त अंडरवर्ल्डमधील सूत्रांना भेटत होते आणि यात राजनच्या प्रतिस्पर्ध्यांचा समावेश होता. यामुळे राजन डे यांच्यावर संतापला होता. त्याने जे. डे यांचा उल्लेख दगाबाज म्हणून केला होता.

फेब्रुवारी २०१२ मध्ये पोलिसांनीही आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात पत्रकार जिग्ना वोराचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिग्नाचे जे. डे यांच्याशी व्यावसायिक वैर असल्याचा दावाही आरोपपत्रात करण्यात आला होता. त्यामुळे छोटा राजनला जे. डेंविरोधात भडकवण्याचे काम जिग्नानेच केले, असे पोलिसांचे म्हणणे होते. हा आरोप न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही आणि जिग्नाला निर्दोष मुक्त करण्यात आले.

Story img Loader