सोडती चालविणाऱ्या व्यापाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या राजेश पवार या एका साप्ताहिकाच्या पत्रकाराला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला बुधवापर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
एका सोडत विक्रेत्याने राजेश हा खंडणी मागत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी सापळा लावून सोमवारी राजेश अटक केली. तो विक्रेत्यांना आपल्या बँकेतील खात्यात थेट दहा हजार रुपये जमा करण्यास सांगत असे. त्याच्या बँक खात्यात ५८ हजार रुपयांची रक्कम सापडली आहे.
अंधेरी, घाटकोपर, डोंबिवली परिसरातील सोडती विक्रेत्यांच्या राजेशविरुद्ध तक्रारी असल्याचे विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. राजेशच्या साप्ताहिकाची नोंदणी रद्द करावी, यासाठी रजिस्ट्रेशन ऑफ न्यूज पेपरला पत्र देण्यात आले आहे, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
खंडणीखोर पत्रकाराला अटक
सोडती चालविणाऱ्या व्यापाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या राजेश पवार या एका साप्ताहिकाच्या पत्रकाराला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे.
First published on: 20-08-2013 at 03:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journalists arrested on extortion charges