मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाट क्रमांक १० ते १४ या फलाटांचे विस्तारीकरण कूर्मगतीने सुरू होते. त्यातील फलाट क्रमांक १०-११ चे विस्तारीकरणाचे काम रविवारी जवळजवळ १०० टक्के पूर्ण झाले आहे. यामुळे आता हा फलाट २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या धावण्यास सक्षम झाला आहे. त्यामुळे १६ डब्यांच्या १३ रेल्वेगाड्यांचे डबे वाढवणे शक्य होणार आहे.

आता फलाट क्रमांक १२, १३, १४ चे विस्तारीकरणाचे नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. मध्य रेल्वेवरील सीएसएमटीवर १८ फलाटांपैकी क्रमांक १ ते ७ लोकल सेवेसाठी आहेत. तर, फलाट क्रमांक ८ ते १८ लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी आहेत. सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १० ते १४ चे विस्तारीकरणाचा, ६२.१२ कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प २०१५-१६ साली मंजूर झाला होता. या फलाटांची लांबी ३०५ मीटर ते ३८५ मीटरने वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले, पण ते मंद वेगाने सुरू असल्याने, प्रकल्पाला उभारणी मिळाली नाही. टाळेबंदीनंतर प्रकल्पाला गती मिळून दोन वर्षांमध्ये प्रकल्पातील महत्त्वाच्या बाबी पूर्ण झाल्या.

Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
madhuri dixit tezaab is highest grossing film of 1988
आधीचे १० सिनेमे झाले फ्लॉप, ‘या’ एका चित्रपटामुळे माधुरी दीक्षित रातोरात झाली सुपरस्टार! शाहरुखशी आहे खास कनेक्शन
Raigad Chi Waghin | Viral Video
VIDEO : रायगडची वाघीन! शिवप्रेमीची दुचाकी एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल
Aishwarya avinash narkar in front of old father reaction viral
Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक
Dance Viral Video
‘डान्स असावा तर असा…’; ‘चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी’ गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
desi jugaad video old fridge convert into shoe rack
बाबो! खराब फ्रीजचा असा वापर तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल; Video पाहून युजर्सनी मारला कपाळावर हात

या विस्तारीकरणासाठी शुक्रवारी १२.३० वाजेपासून ते रविवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला. सीएसएमटी येथे ‘नॉन-इंटरलॉकिंग’चे काम करण्यात आले. तसेच, कार्यक्षम आणि एकात्मिक ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिग्नलिंग सिस्टम’ची अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा आणि भविष्यातील गतिशीलता वाढवणे शक्य होणार आहे.

हेही वाचा >>>मुंबई : पाणीसाठा अवघा ८ टक्के, आता राखीव साठ्यावर भिस्त

ब्लॉकनंतर पहिली लोकल सीएसएमटी-टिटवाळा

ब्लॉक संपल्यानंतर सीएसएमटी येथे बंद असलेली लोकल सेवा सुरू झाली. पहिली लोकल सीएसएमटीवरून टिटवाळ्याच्या दिशेने धावली. ब्लॉकच्या कालावधीत हार्बर मार्गावरील लोकल वडाळ्यापर्यंत तर मुख्य मार्गावरील लोकल दादर, परळ आणि भायखळ्यापर्यंत धावत होत्या. सीएसएमटीवरून टिटवाळ्याच्या दिशेने लोकल धावल्यानंतर इतर सर्व दिशेकडील लोकल सुरू झाल्या.

भारतीय रेल्वेच्या सर्वात व्यग्र ‘कोचिंग टर्मिनल्स’पैकी एक असलेल्या सीएसएमटीच्या ‘नॉन इंटलॉकिंग’ कामासह काम केले गेले. नियोजित ब्लॉकमध्ये हे काम पूर्ण झाले. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे संपूर्ण मुंबईने सहकार्य केले. जवळजवळ प्रत्येक संस्थेने घरून काम करण्याची परवानगी दिल्याने स्थानकांवर गर्दी नव्हती.- रजनीश कुमार गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग, मध्य रेल्वे

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १०, ११ चे २४ डब्यांच्या विस्ताराचे आव्हानात्मक काम यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्याचा फायदा लोकल आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना होईल. मूलभूत पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्याच्या या संपूर्ण प्रयत्नात पाठिंबा देणाऱ्या मुंबईकरांच्या भावनेचे कौतुक करतो.- राम यादव, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे

वक्तशीरपणा नाहीच

सीएसएमटीच्या फलाट १०-११चे विस्तारीकरण पूर्ण झाल्यानंतरही लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्यांना होणाऱ्या विलंबामध्ये सुधारणा होणार नाही. २४ डब्यांची रेल्वेगाडी उभी राहील, एवढ्या लांबीचे फलाट तयार केले जात आहेत. त्यामुळे सीएसएमटीवरून सुटणाऱ्या १२ ते १८ डब्यांच्या गाडीला अधिकच्या ६ ते १२ डब्यांची जोड होईल. मात्र इतर फलाटांचे विस्तारीकरण बाकी असल्याने, सध्यातरी रेल्वेगाड्यांना उशीर होणारच आहे. दरम्यान, सीएसएमटी येथे लांब पल्ल्याच्या गाड्यांना वळण घेऊन दाखल व्हावे लागत होते. फलाटांचे काम झाल्याने वळण वाचणार असले तरी त्यामुळे विलंबावर फारसा परिणाम होण्याची सध्यातरी शक्यता नाही.

● २०१५-१६ मध्ये विस्तारीकरण प्रकल्पाला मंजुरी

● प्रकल्पाची किंमत ६२.१२ कोटी रुपये

● फलाट क्रमांक १०-११ची आता एकूण ६९० मीटर

● २४ डब्यांच्या प्रवासी रेल्वेगाड्या उभ्या राहणे शक्य

● पॉइंट्स, सिग्नल्स, डीसी ट्रॅक सर्किट आणि इतर तांत्रिक कामेही पूर्ण

● २५० कुशल आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम कर्मचारी, अधिकारी आणि पर्यवेक्षक

●ब्लॉकदरम्यान ९३५ उपनगरीय गाड्या रद्द करण्यात आल्या.

●याशिवाय ७४ रेल्वेगाड्या रद्द आणि १२२ रेल्वेगाड्या अंशत: रद्द

(मेगाब्लॉक संपुष्टात आल्यानंतर रविवारी दुपारपासून सीएसएमटीपर्यंत येऊ लागल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. छाया : गणेशशिर्सेकर)