जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ात सर्वच संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या काविळीच्या रुग्णांची संख्या गेल्या आठवडय़ापेक्षा दीडपट झाली आहे. त्याशिवाय डेंग्यू, गॅस्ट्रो आणि विषमज्वराचे रुग्णही वाढले आहेत.
सात ते १३ ऑगस्टदरम्यान पालिका रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये संसर्गजन्य आजाराचे प्रमाण अधिक आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात डेंग्यूचे सहा रुग्ण आढळले होते. दुसऱ्या आठवडय़ात ११ रुग्ण आढळले. शहरातील केवळ तीस टक्के नागरिक पालिकेची आरोग्यव्यवस्था वापरतात तर खासगी रुग्णालयांतही अनेकजण दाखल होत असल्याने शहरातील रुग्णांची संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.
गेल्या सात दिवसात पटकीचे सात, कावीळीचे २९, विषमज्वराचे ४२, गॅस्ट्रोचे २६०, डेंग्यूचे ११, लेप्टोचा एक, हिवतापाचे २५७ रुग्ण आढळले. दरम्यान पालिकेकडून घेतल्या जाणाऱ्या गरीब वस्तीमधील आरोग्यशिबिरांमधून आतापर्यंत २८ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.  

Story img Loader