मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी ज्येष्ठ न्यायमूर्ती विजया कमलेश ताहिलरामानी यांची नियुक्ती करण्यात आली. सध्याचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा हे बुधवारी पदावरून निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी विजया ताहिलरामानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राज्य घटनेतील अनुच्छेद २२३ नुसार ही नियुक्ती केली असल्याचे कायदा व न्याय मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. तीन आक्टोबर १९५८ रोजी जन्मलेल्या ताहिलरामानी यांनी १९८२ पासून मुंबईमध्ये उच्च न्यायालयात वकिली करण्यास सुरुवात केली. त्यांनी अतिरिक्त सरकारी वकील म्हणून काम केले असून, अनेक प्रकरणांमध्ये सरकारची बाजू मांडली आहे. २००१ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली.
आणखी वाचा