मुंबई: करोना काळात आरोग्य खात्याची धुरा सांभाळणारे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेले योगदान शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. फक्त करोनाच नव्हे इतर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी देखील त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे आहे, असे गौरवोद्गार महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी काढले. काकाणी शासकीय सेवेतून  शनिवारी सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने सेवानिवृत्तीचा समारंभ महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्त सभागृहात शुक्रवारी झाला.

काकाणी यांचा शांत, संयमी, मृदू स्वभाव, कामकाजाचा कितीही तणाव असला तरी डोके शांत ठेवून काम करण्याची सवय यामुळे करोना कालावधीत आरोग्य खात्याला योग्य अधिकारी लाभला. विशेष म्हणजे कामकाजात अत्यंत व्यस्त असूनही दिलेल्या वेळेत प्रत्येक काम पूर्ण करणे या सर्व गुणांचा मिलाफ काकाणी यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे, असे कौतुकही डॉ. चहल यांनी केले.

Story img Loader