काळबादेवी येथील इमारतीला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या मुंबई अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांना शौर्यपदक देण्यासंदर्भात राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच या अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी देण्यात येईल, अशी माहिती नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.
नीलम गोऱ्हे, किरण पावसकर यांनी यांनी या संदर्भातील लक्षवेधी तसेच प्रश्न मांडला होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री बोलत होते. काळबादेवी येथील इमारतीला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या अधिकारी व जवानांच्या कुटुंबीयांना महापालिकेच्या प्रचलित तरतुदीप्रमाणे आíथक मदत करण्यात आली आहे. या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च मुंबई महापालिका करणार आहे. तसेच त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही पाटील सांगितले.

Story img Loader