मुंबईतील एसी लोकल विरोधात प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. एसी लोकलमुळे इतर रेल्वे गाड्या रद्द होत असल्याने मुंबईतील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा खोळंबा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्र्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला गंभीर इशारा दिला आहे. गरीब माणसाला जर एसी परवडत नसेल, तर एसी फेकू आंदोलन करू, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे. हा प्रश्न केवळ कळवा-मुंब्रा पुरता मर्यादीत नाही. हे आंदोलन गरीब विरुद्ध एअर कंडिशन असे असल्याचे आव्हाड म्हणाले आहेत.

शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार? अमोल मिटकरींचं मोठं विधान, म्हणाले “सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर…”

एसी लोकल गाड्यांविरोधात सर्वसामान्य प्रवासी रुळांवर उतरल्यास रेल्वे प्रशासनाला हे आंदोलन थांबवता येणार नाही, असेही आव्हाड कळव्यात पार पडलेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. “रेल्वेने दुपारी १२ ते संध्याकाळी पाच या वेळेत कितीही एसी लोकल फेऱ्या चालवल्या तरी आमची हरकत नाही. मात्र, चाकरमान्यांच्या कामांच्या वेळात एसी लोकल चालू देणार नाही” असा पवित्रा आव्हाड यांनी घेतला आहे. लोकल गाड्यांचे वेळापत्रक बदलण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवालही रेल्वे अधिकाऱ्यांना आव्हाड यांनी विचारला.

Shivsena Sambhaji Brigade Yuti: “भाजपाशी युती असताना त्यांनी तरी २५ वर्षांमध्ये…”, “४०-५० ‘खोके हराम’ ऊठसूट…”; सेनेचा हल्लाबोल

दरम्यान, रात्री १० नंतर मुंबईत धावणाऱ्या एक्स्प्रेस, मेल गाड्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणावरुनही आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनावर निशाणा साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाने डेसिबल संदर्भात काही नियम घालून दिले आहेत. रात्री दहानंतर ४५ डेसिबलच्या खाली आवाज असावा असे निर्बंध सर्वोच्च न्यायालयाने घातले आहेत. असे असताना रात्री १० नंतर धावणाऱ्या एक्स्प्रेस आणि मेल गाड्यांच्या आवाज हा १७५ डेसिबल असतो. यासंदर्भात रेल्वेला सर्वोच्च न्यायालयाने सुट दिली आहे का? असा सवाल त्यांनी विचारला.

बँकेत खाते नसले तरी त्यांच्या मागे ईडी लागते -आ. नीलेश लंके ; राजकारण चुकीच्या पध्दतीने सुरू असल्याचा आरोप

रेल्वे स्थानकांलगत असलेल्या सोसायट्यांच्या सुरक्षिततेवरुनही आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला लक्ष्य केलं आहे. “रेल्वे स्थानकांलगत असलेल्या सोसायट्यांमधील प्रवाशांना रात्री धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या आवाजाचा भयंकर त्रास होत आहे. या गाड्यांमुळे अनेक इमारतींना तडे गेले आहेत. भविष्यात या इमारती कमकुवत होऊन पडल्यास याला जबाबदार कोण?”, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. कुठलाच कायदा लागू होत नाही, असे रेल्वेला वाटते का, असा हल्लाबोलही आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनावर केला आहे.

Story img Loader