नागोठणे येथे दिवा-सावंतवाडी गाडीला झालेल्या अपघातामुळे नागोठणे भागात अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी कल्याण, डोंबिवलीतील त्यांच्या नातेवाइकांनी खास वाहने पाठवून मदत केली. अडकलेल्या या प्रवाशांना नागोठणे भागात असलेल्या आपल्या नातेवाईक, शेजाऱ्यांच्या ओळखीने या वाहनांच्या साहाय्याने सोडून तेथे राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.
कल्याण, डोंबिवलीतील कोकणात जाणारे काही प्रवासी दिवा येथे चढताना गाडीला खूप गर्दी असते म्हणून पनवेल रेल्वे स्थानकात जाऊन गाडी पकडतात. या भागातून अनेक प्रवासी दिवा, पनवेल येथून सावंतवाडी गाडीने कोकणात जात होते. गाडीला अपघात झाल्याचे सकाळी कळताच कल्याण, डोंबिवलीतील या प्रवाशांच्या नातेवाइकांनी खास वाहने पाठवून अडकलेल्या प्रवाशांची व्यवस्था केली. अनेक प्रवाशांना शेजारी राहत असलेल्या नातेवाइकांच्या घरी जाऊन राहण्यास सांगण्यात येत होते. त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येत होती. या मार्गावरील वाहतूक केव्हा सुरळीत होईल याची शाश्वती नसल्याने अनेक प्रवासी कल्याण, डोंबिवलीकडे जामानिमा घेऊन परतत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा