कल्याण डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा डिसेंबरअखेपर्यंत सोमवारी रात्री १२ ते मंगळवारी रात्री १२ असा २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये पुरवठा चार वेळा बंद राहील.
मोहिली येथून शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी पाणी उचलते जाते. हे पाणी बारवे, नेतिवली, टिटवाळा, मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण, डोंबिवली शहरांना पुरवले जाते. ३१ डिसेंबपर्यंत पाणीबचतीचे नियोजन करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेचा पाणीपुरवठा १८ नोव्हेंबर, २ डिसेंबर, १६ डिसेंबर आणि ३० डिसेंबर या कालावधीत सोमवारी रात्री बारा ते मंगळवार रात्री बारा या कालावधीत बंद असेल.

Story img Loader