कल्याणमध्ये दसऱयाच्या दिवशीच एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात  खळबळजनक घटना घडली आहे. कल्याणमधील आग्रारोडजवळील गणपती चौकातील मयुरेश इमारतीत चौथ्यामजल्यावर राहणाऱया वानखेडे कुटुंबातील तीन जणांची हत्या करण्यात आली. यात आई-वडील आणि मुलाचा समावेश आहे.
वानखेडे यांच्या घरात सुभाष वानखेडे आणि प्रमोदिनी वानखेडे यांचे मृतदेह हातपाय बांधलेल्या स्थितीत होते. तर त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर वानखेडे याच्या तोंडाला पिशवी बांधून तोंडात गॅस सिलेंडरचा पाईप टाकून त्याला मारण्यात आले आहे. अशा प्रकारचे विचित्र हत्याकांड कोणी घडवून आणले याचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील अर्धा किलो सोने लुटण्यात आले आहे. त्यानंतर सुरू असलेल्या तपासानुसार वानखेडे कुटुंबाचे कोणाशीही वैर नव्हते. त्यांच्या मुलानेच आई-वडिलांचा खून करुन नंतर स्वत: आत्महत्या केल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले आहे. तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे हत्याकांड होण्याआधी ज्ञानेश्वर वानखेडेने कल्याण पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला होता. तसेच जवळपासच्या नातेवाईकांना मोबाईलवरून एसएमएस पाठविले होते.

Story img Loader