मुंबई : कल्याण रेल्वे यार्डचे नूतनीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले असून लोकल प्रवास सुकर करण्यासाठी या स्थानकात लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र फलाट तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन वर्ष लागणार आहेत. डिसेंबर २०२५ पर्यंत विविध कामे पूर्ण होण्यासाठी कालावधी लागणार असल्याची माहीती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. त्यानंतरच लोकल प्रवास सुकर होणार आहे.

हेही वाचा… दिवाळीपूर्वी मुंबईत मोठी कारवाई; २३ लाख ७४ हजारांची भेसळयुक्त मिठाई जप्त

The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात
MHADA Konkan Board lottery Application sale-approval process extended by 15 days again
म्हाडा कोकण मंडळ सोडत : अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेला पुन्हा १५ दिवसांची मुदवाढ
National Book Trust is expanding across India with offices opening in Pune cities
एनबीटीची वार्षिक उलाढाल प्रथमच ५०० कोटी रुपयांवर, आता देशभरात विस्तारीकरण
knight frank report, Private investment Mumbai ,
मुंबईत गृहनिर्मिती क्षेत्रात यंदा साडेतीन हजार कोटींची खासगी गुंतवणूक, ‘नाईट फ्रँक’च्या अहवालातील माहिती

कल्याणपासून सीएसटीपर्यंत किंवा पुन्हा कल्याणपर्यंत मेल,एक्स्प्रेस येताच त्यांच्यासाठी जलद लोकल थांबविल्या जातात. त्याचा परिणाम जलद लोकलच्या वेळापत्रकावर होतो आणि त्या उशिराने धावतात. कल्याण स्थानकात सध्या सात फलाट असून यातील दोन आणि तीन, चार व पाच तसेच सहा व सात क्रमांकाचे फलाट हे सामायिक आहेत. यातील चार व पाच आणि सहा व सात क्रमांकाच्या फलाटांवर लांब पल्ल्याच्या गाडय़ा येतात. तर पाच क्रमांकाच्या फलाटावरून सीएसएमटीला आणि चार क्रमांकाच्या फलाटांवर खोपोली, कसारयासाठी जलद लोकल धावतात. एका फलाटावरून फक्त कल्याण स्थानकातून लोकल सुटतात. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र फलाट बांधल्याने लोकल प्रवास सुकर होणार आहे.

हेही वाचा… सीबीआयला राज्यात थेट चौकशीचे अधिकार; शिंदे सरकारनं फिरवला ठाकरे सरकारचा निर्णय

त्यामुळे मेल एक्स्प्रेसाठी कल्याण स्थानकाच्या पूर्वेला मालवाहतूक गाडय़ांसाठी असलेल्या राखीव जागेवरच मार्गिका आणि स्वतंत्र युनिवर्सल सहा फलाट बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मालवाहतुकीसाठीही स्वतंत्र मार्ग करण्यात येणार आहे. एमयूटीपी -३ ए अंतर्गत असलेल्या या प्रकल्पाला २०१८-१९ मध्ये मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पासाठी ८१२ कोटी रुपये खर्च येणार आहे. या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. स्वतंत्र फलाट बांधण्यासाठी मध्य रेल्वेकडून काही किरकोळ कामांना सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय ४४ इमारती आणि २४ अन्य बांधकामे पाडण्यात येणार आहेत. फलाट, रूळ, सरंक्षक भिंत, पाण्याचा निचरा करणारी ड्रेनेज यंत्रणा, ओव्हरहेड वायरसह अनेक कामे करावी लागणार असल्याची माहीती मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. विविध कामे दोन टप्प्यात पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत निश्चित केल्याचे ते म्हणाले. यानंतरच लोकल प्रवास सुरळीत होणे शक्य होणार आहे.

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live : मुळशी-मुंबई मार्गाचे काम एक महिन्यात मार्गी लागणार; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

आणखी काय होणार

बारा मिटर रुंदीचे तीन पादचारी पूल, नवीन स्थानकाची इमारत, मेल-एक्स्प्रेस आणि मालवाहतूक स्थानकाबाहेर प्रवाशांना वावरण्यासाठी मोकळी जागा यासह अन्य सुविधांची भर पडेल.

Story img Loader