विश्वरुपमच्या प्रदर्शनावर तमिळनाडू सरकारने घातलेल्या बंदीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार नसल्याचे अभिनेता कमल हासन यांनी गुरुवारी स्पष्ट केले. या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये काढून टाकण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विश्वरुपमवरून तमिळनाडू सरकारबरोबर निर्माण झालेली वादाची स्थिती निवळेल, अशी मला आशा आहे. तोपर्यंत तरी मी सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही, असे कमल हासन याने म्हंटले आहे.
तमिळनाडूमधील सर्व ३१ जिल्हाधिकाऱयांनी आपल्या अधिकारात विश्वरुपमवर घातलेली बंदी मद्रास उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीस खंडपीठाने बुधवारी कायम ठेवली होती. त्यामुळे कमल हासन व्य़थित झाले आहेत. बंदीमागे तमिळनाडूमधील राजकारण असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.