वरळीतील इमारतीत ठिकठिकाणी भेगा, मोडक्या खिडक्या; अत्यावश्यक उपकरणांचीही कमतरता

मुंबई : राज्य कामगार विमा आयोगाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने वरळीच्या राज्य कामगार विमा (ईएसआयएस) रुग्णालयाची व इमारतीची दुरवस्था झाली आहे. या इमारतीच्या खिडक्यांवरचे ‘पॅरापिट’ ढासळले असून त्यातून शिगा बाहेर आल्या आहेत. तसेच खिडक्यांच्या काचाही तुटल्या आहेत. औषधे आणि आवश्यक उपकरणे वेळेवर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचेही हाल होत आहेत.

Puneri patya viral puneri pati outside hospital funny puneri poster goes viral
PHOTO:“मी डॉक्टर आहे इंजेक्शनसाठी…” दवाखान्याबाहेर पेशंटसाठी लिहलेल्या सूचना वाचून पोट धरुन हसाल
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Bigg Boss 18 wild card kashish Kapoor target eisha singh watch promo
Bigg Boss 18: वाइल्ड कार्ड सदस्यांमुळे ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण तापलं, कशिश कपूरने ‘या’ सदस्याला केलं टार्गेट, म्हणाली…
pune video
वाढीव पुणेकर! एवढे उत्साही लोक फक्त पुण्यातच भेटतात, पठ्ठ्याने कारला केली लायटिंग, Video Viral
Number of people injured while bursting firecrackers on Diwali rises to 49 mumbai print news
दिवाळीत फटाके फोडताना जखमी झालेल्यांची संख्या ४९ वर
caught Fire at ten places due to firecracker fire broke out in a third floor flat in Kasarwadi
पिंपरी : फटाक्यांमुळे दहा ठिकाणी आगीच्या घटना; कासारवाडीतील तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेला आग
Firecrackers video
ऐन दिवाळीत मुलांच्या हॉस्टेलमध्ये पेटला वाद! विद्यार्थ्यांनी एकमेकांवर सोडले रॉकेट, धक्कादायक घटनेचा Video Viral
Pune redevelopment old buildings, Pune old buildings, Stalled redevelopment old buildings pune,
पुणे : जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास, अरुंद रस्ते कुठे आहेत हे प्रश्न !

वरळीच्या या ईएसआयएस रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी ५ रहिवासी इमारतीही आहेत. सर्व इमारतींच्या भिंती आणि स्लॅबला भलीमोठी भगदाडे पडली आहेत. येथील नागरिक दीनानाथ कुमार यांची गरोदर पत्नी या रुग्णालयात दाखल आहे. मात्र त्यांना डॉक्टरांनी लिहून दिलेले टॉनिक इथल्या मेडिकलमध्ये उपलब्ध नाही. ‘‘या रुग्णालयात फक्त गरोदर महिलांसाठी वेगळा वॉर्ड आहे. इतर महिला रुग्ण आणि लहान मुले यांना एकाच वॉर्डमध्ये ठेवण्यात येते. सर्वप्रकारच्या पुरुष रुग्णांसाठीही एकच वॉर्ड आहे,’’  असे कुमार यांनी सांगितले. त्यांना माहिती अधिकाराअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर २०१६ ते सप्टेंबर २०१८ या काळात रुग्णालयाच्या देखभाल दुरुस्तीवर ७६ लाख ४६ हजार ७६३ रुपये खर्च केला गेला आहे.

‘‘४ वर्षांपूर्वी इमारतीचे संरचना परिक्षण झाले आहे. त्यानुसार आवश्यक त्या दुरुस्त्याही करण्यात आल्या आहेत. ईएसआयएसकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने काही ठिकाणी भिंतींची अवस्था खराब आहे, मात्र इमारत धोकादायक नाही. पूर्वी दिल्लीच्या सेंट्रल रेट कॉन्ट्रॅक्टकडून औषधे खरेदी केली जात होती. तेव्हा पुरवठा सुरळीत सुरू होता. पण जुलै २०१७ मध्ये शासनाने काढलेल्या आदेशानुसार सर्व शासकीय रुग्णालयांना औषधे आणि उपकरणे हाफकिनकडून खरेदी करावी लागतात. प्रत्येक औषधासाठी हाफकिन निविदा काढते.

ही प्रकिया अतिशय वेळकाढू असल्याने औषधे वेळेवर उपलब्ध होत नाही,’’ अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. जी. कोळनूरकर यांनी दिली.

कोळनूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी अंधेरीच्या ईएसआयसी रुग्णालयाकडून १६० औषधे तीन महिन्यांसाठी मागवण्यात आली होती. सध्याही असाच प्रयत्न सुरू आहे. रुग्णालयात प्राथमिक तपासणी उपकरणे उपलब्ध आहेत. मात्र सेल काऊंटर, सीटीस्कॅन, एमआरआय उपकरणे नसल्याने रुग्णांना इतर ठिकाणी पाठवले जाते.

या रुग्णालयाचा एक मजला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आणि वैद्यकीय प्रशासन अधिकारी यांच्या कार्यालयाला देण्यात आला आहे. त्यामुळे ३०० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात सध्या १५० खाटाच कार्यान्वित आहेत.