मुंबई : ‘नेटफ्लिक्स’वर सध्या प्रसारित करण्यात आलेल्या ‘सिकंदर का मुकद्दर’ या चित्रपटात फ्लेमिंगो पक्ष्यांचे ड्रोनच्या सहाय्याने चित्रिकरण केल्याची तक्रार पक्षीप्रेमींनी केली होती . दरम्यान, या तक्रारीची कांदळवन कक्षाने दखल घेतली असून, याप्रकरणी संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे कांदळवन कक्षाने स्पष्ट केले.

‘सिकंदर का मुकद्दर’ या चित्रपटात ड्रोन कॅमेरा फ्लेमिंगोंच्या अगदी नजिक नेत चित्रीकरण करण्यात आल्याने पक्षीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत पर्यावरणवादी, तसेच पक्षीप्रेमींनी कांदळवन कक्ष आणि महाराष्ट्र मुख्य वन नियंत्रक यांच्याकडे तक्रार केली आहे. दरम्यान, या तक्रारीची कांदळवन कक्षाचे प्रमुख एस. व्ही. रामाराव, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी दोषी आढळणाऱ्यांविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. चित्रिकरण करण्यापूर्वी पोलिसांकडून परवानगी घेतली होती का याबाबतची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही, असे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांनी सांगितले. आवश्यक माहिती प्राप्त झाल्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यास नोटीस बजावण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा >>>परळमधील पदपथावर चिमुरडीसोबत अश्लील कृत्य; २७ वर्षीय आरोपीला अटक

दरम्यान, नेरुळ येथील टीएस चाणक्य खाडीत हे चित्रीकरण करण्यात आल्याचे निसर्गप्रेमींनी सांगितले. चित्रीकरणात ड्रोनच्या पात्यांमुळे फ्लेमिंगो जखमी होण्याची शक्यता असते. तसेच ड्रोनचा आवाजही बऱ्यापैकी असतो, यामुळे फ्लेमिंगो विचलित होऊन त्यांच्या अधिवासातून बाहेर येऊ शकतात. यामुळे कोणतीही दुर्घटना घडू शकते. यापूर्वीही या परिसरात अनेक फ्लेमिंगोचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याचीच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून या प्रकरणाची कसून चौकशी करावी, अशी मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे.

Story img Loader