कांदिवलीतील चारकोप परिसरातील ऑक्सफर्ड पब्लिक स्कूलमध्ये एक विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, २ दिवस उलटले तरीदेखील शाळा प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळे संतप्त पालकांनी आज शाळेत एकच गोंधळ घातला. या दोषी मुलांवर शाळेकडून कारवाई व्हावी, अशी पालकांची मागणी आहे. या प्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरु आहे. पण अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद धावरे यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझी मुलगी (इ. सहावी) शाळेत आली असताना पाच-सहा मुले तिच्यामागे येऊन उभी राहिली आणि त्यांनी तिचा स्कर्टवर करून तिची छेडछाड केली. ती रडत असतानाही शाळेच्या सुरक्षारक्षकाने त्यांना थांबवले नाही. या घटनेची तक्रार विद्यार्थीनीने जेव्हा मुख्याध्यापिकेकडे केली, तेव्हा त्यांनी या घटनेकडे कानाडोळा केला. इतकेच नव्हे तर मुलीलाच दमदाटी करून शांत केले, अशी तक्रार मुलीच्या आईने केली आहे.

यानंतर पीडित मुलीच्या आईने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र तिथेही त्यांची निराशा झाली. आठ तासानंतरही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली गेली नाही. रात्री दोन वाजता मुलीचे मेडिकल केले गेले. सकाळी ११ पर्यंतही पोलीस शाळेत गेले नसल्याचे पाहून पालकांनी त्यांना जाब विचारला. त्यावेळी आपल्याकडे स्टाफ उपलब्ध नसल्याचे तक्रारकर्त्या मुलीच्या आईला पोलिसांनी खेदजनक उत्त्तर दिले.

या घटनेचे व्यवस्थित दिसू शकेल असे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध झाले नाही. यानंतर, मुलीच्या आईने आणि शाळेतल्या आणखी काही पालकांनी शाळेत येऊन गोंधळ घातल्यानंतर अखेर पोलीस शाळेत हजर झाले. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत पालकांनी शाळेत एकच गोंधळ घातला होता.