एमबीएचा अभ्यासक्रम हा ‘इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी’कडून मान्यताप्राप्त असल्याचे सांगून १० विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या कांदिवली येथील सुमन एज्युकेशन सोसायटीला ग्राहक मंचाने फसवणूक व गैरप्रकार केल्याप्रकरणी दोषी धरले आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांला दीड लाख रुपयांचे शुल्क १२ टक्के व्याजाने परत करण्याचे आणि कायदेशीर लढाईचा खर्च म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे आदेश देत मोठा दणका दिला आहे.
आपला अभ्यासक्रम हा विद्यापीठ वा प्रतिष्ठित शिक्षण संस्थेकडून मान्यताप्राप्त असल्याचे सांगून एखादे महाविद्यालय सुरू करण्यात आले असेल तरी ती फसवणूक आहे, असा निर्वाळा ग्राहक मंचाने हा निकाल देताना दिला. विद्यापीठाकडून मान्यताप्राप्त नसलेल्या अभ्यासक्रमाला काहीच अर्थ नसल्याचेही मंचाने या वेळी नमूद केले आहे.
चारकोप येथील एल. एन. व्यवस्थापन तंत्रज्ञान महाविद्यालयातर्फे सुमन एज्युकेशन सोसायटी चालविण्यात येते. अभ्यासक्रम संलग्न नसतानाही तो संलग्न असल्याचे सांगून महाविद्यालयाने आपली फसवणूक केल्याची तक्रार दहा विद्यार्थ्यांनी दक्षिण जिल्हा ग्राहक मंचाकडे केली होती.
 २००९ मध्ये या विद्यार्थ्यांनी एमबीए अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्या वेळी महाविद्यालयाने त्यांना आपला अभ्यासक्रम हा ‘इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी’कडून मान्यताप्राप्त असल्याचा दावा केला होता. मात्र अभ्यासक्रमाचे एक वर्ष पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयाने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच या विद्यार्थ्यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा