मुंबईप्रमाणेच उपनगरातील रुग्णालये अत्याधुनिक करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. महानगरपालिका पश्चिम उपनगरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्‍तम नरसी कूपर रुग्‍णालयामधील नवजात शिशू अतिदक्षता विभागात ‘कांगारू मदर केअर’ कक्ष सुरू करीत आले आहे. यामुळे नवजात शिशुंना वैद्यकीय उपचारासोबतच इतर विशेष सेवा उपलब्ध करणे शक्य होणार आहे.

हेही वाचा >>>पवार, ठाकरे यांच्या नावे अमृता फडणवीस यांना धमक्या, अनीक्षा जयसिंघानीच्या भ्रमणध्वनी संदेशाच्या आधारे पोलिसांचा दावा

pune telemedicine service introduced in remote areas of state
राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील जनतेला ‘टेलिमेडिसीन’ सेवेचा आधार!
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Bhushan Gagrani inaugurated the 'Home Away From Home' building
बीएमटी केंद्रातील रुग्ण, पालकांच्या निवासासाठी स्वतंत्र इमारत, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे हस्ते झाले लोकार्पण
unregistered doctors , Maharashtra Medical Council,
नोंदणीकृत नसलेल्या डॉक्टरांवर नववर्षात कारवाई, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा निर्णय
Prataprao Jadhav
बुलढाण्यातील ‘केस गळती’ची मोदी सरकारकडून दखल; दिल्ली, चेन्नईतील डॉक्टरांची पथकं येणार, ICMR कडून संशोधन सुरू, केंद्रीय मंत्र्याची माहिती
vn desai hospital
मुंबई : व्ही. एन. देसाई रुग्णालयातील नूतनीकरणाच्या कामामुळे रुग्णांची गैरसोय
Mahatma Phule Jan Arogya Yojana
‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’तील रुग्णालयांची स्वतंत्र पथकामार्फत चौकशी!
nashik Dialysis center service
नाशिक महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात आता डायलिसीस केंद्र

कूपर रुग्‍णालयाच्‍या नवजात शिशू अतिदक्षता विभागामधील या कक्षामुळे येथे दाखल नवजात शिशुंना वैद्यकीय उपचारासोबतच इतर विशेष सेवा उपलब्ध करता येणार आहेत. येथे शिशुंच्‍या सर्वांगीण आरोग्‍याची काळजी घेतली जाईल. कुपोषणामुळे संभाव्य इतर आजारांचे धोके कमी होतील. तसेच मातांचे शारीरिक व मानसिक आरोग्‍य सुधारेल. कांगारू मदर केअर कक्षामधील दृकश्राव्य संचाद्वारे मातेला बाळाच्‍या प्रकृतीची योग्‍य काळजी व देखभाल घेण्‍याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले.

हेही वाचा >>>वर्सोवा पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली; मुंबई, ठाण्याहून गुजरातला जाणे सोयीचे

‘ॲक्शन अगेन्‍स्‍ट हंगर’ या स्‍वयंसेवी संस्‍थेच्‍या सहकार्याने ही सुविधा सुरू करण्‍यात आली आहे. यासाठी कूपर रुग्णालयाचे अधिष्‍ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी विशेष प्रयत्‍न केले. या युनिटच्‍या उद्घाटनला ॲक्‍शन अगेन्‍स्‍ट हंगर संस्‍थेचे अध्‍यक्ष अश्विनी कक्‍कर, तसेच मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. उल्‍हास वसावे, नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्‍या (एनआयसीयू) प्रमुख डॉ. चारुशीला कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Story img Loader