शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या अनेक मागण्यांसाठी परळ येथील कामगार मदानात आमदार कपिल पाटील यांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे.  
पाटील यांना विविध संघटनांबरोबरच क्रिकेटपटू विनोद कांबळी, कामगार नेते शरद राव यांच्याबरोबर उत्तर प्रदेशातील शिक्षक संघटनेनेही आपला पािठबा दर्शविला आहे. रात्री उशीरा शिक्षणमंत्र्यांनी पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि याबाबत आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेऊ असेही स्पष्ट केले. असे असले तरी निर्णय होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका पाटील यांनी घेतली आहे.
दरम्यान, वस्तीशाळा शिक्षकांना कायम करावे, या मागणीसाठी परळ येथील कामगार मदानात बेमुदत उपोषणाला बसलेल्या वस्तीशाळा शिक्षकांनी मंगळवारी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावर निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी १०० शिक्षिकांना अटक करून नंतर सुटका केली. त्यानंतर या शिक्षकांनी दादर येथील काँग्रेसच्या टिळक भवनाजवळ आपला मोर्चा वळविला. तर काही शिक्षकांनी परळ येथे मेणबत्ती मोर्चा काढून  विरोध प्रकट केला. परळ येथे वस्तीशाळा शिक्षकांचे नेते नवनाथ गेंड सुमारे तीन हजार शिक्षकांसह उपोषणाला बसले आहेत.

Story img Loader