मराठी भाषा विभागाअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि मराठी भाषा सल्लागार समिती यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी ‘तरुण भारत’चे प्रबंध संपादक व साप्ताहिक विवेक आणि अन्य नियतकालिकांचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांची निवड करण्यात आली आहे. तर भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीसह समिती आणि दोन मंडळांवरील सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठी भाषा विभाग व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या दिलीप करंबेळकर, सुधीर जोगळेकर, सुधीर पाठक, अरुण करमरकर, विवेक घळसासी आदींची समित्यांवर नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य
अरविंद जामखेडकर, मेजर जनरल शशिकांत पित्रे, अरुण फडके, सुहास बहुलकर, श्रीनंद बापट, प्रदीप कर्णिक, दत्तात्रय पाष्टे, डॉ. अरुणचंद्र पाठक,
डॉ. वसंत शिंदे, दीपक जेवणे, डॉ. गौरी माहुलीकर, प्रा. लक्ष्मणराव टोपले, भगवान इंगळे, सुरेश वाघे, डॉ. बाळ फोंडके, डॉ. ग. व्या. माने, डॉ. चंद्रशेखर सोलापुरे, डॉ. नीरज हातेकर, विवेक घळसासी, वसंत आबाजी डहाके, आशा बगे, डॉ. अक्षयकुमार काळे.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य
आनंद हर्डीकर, भारत सासणे, भीमराव गस्ती, डॉ. ईश्वर नंदपुरे, डॉ. लीना रस्तोगी, ज्योतीराम कदम, उत्तम बंडू तुपे, डॉ. शरद व्यवहारे, शशिकांत सावंत, रेखा बैजल, रेणू पाचपोर, इब्राहिम अफगाण, अशोक कोतवाल, आशुतोष अडोणी, डॉ. प्र. न. जोशी, हेमंत दिवटे, मनस्विनी प्रभुणे, रवींद्र गोळे, शिरीष गोपाळ देशपांडे, डॉ. उषा देशमुख, प्रभा गणोरकर, सुधीर पाठक, वामन तेलंग, आशा सावदेकर, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, प्रकाश एदलाबादकर, सुप्रिया अय्यर.
भाषा सल्लागार समितीचे सदस्य
डॉ. अनिल गोरे, डॉ. हेमचंद्र प्रधान, डॉ. अविनाश बिनीवाले, प्रा. पुष्पा गावीत, प्रा. शंकर धडके, प्रा. प्रकाश परब, अरुण करमरकर, अरुण जोशी, श्री. द. महाजन, डॉ. गिरीश दळवी, माधव जोशी, अश्विनी मयेकर, स्वाती राजे, अॅड. दीपक गायकवाड, प्रा. संतोष क्षीरसागर, विनोद पवार, डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. सुजाता महाजन, डॉ. विनोद राठोड, अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (मराठी भाषा विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग), संचालक राज्य मराठी विकास संस्था, सचिव, राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, सचिव, राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, संचालक भाषा संचालनालय.