लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई: मालाड पूर्व येथे मुष्टीयुद्धाचे प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी २७ वर्षीय आरोपीला कुरार पोलिसांनी अटक केली.
आणखी वाचा-महालक्ष्मी येथे सर्वांत उंच ४२ मजली झोपडपट्टी पुनर्वसन टॉवर!
आरोपीचा कराटे प्रशिक्षणाचा व्यवसाय आहे. प्राथमिक तपासात आरोपीने पीडित मुलीचे मोबाइलवर चित्रीकरणही केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंग व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी जून महिन्यापासून प्रशिक्षणाच्या बहाण्याने पीडित १५ वर्षीय मुलीचा विनयभंग करीत होता. याबाबतची माहिती पीडित मुलीने तिच्या आईला दिल्यानंतर तिने याप्रकरणी कुरार पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसानी विनयभंग व माहिती तंत्रज्ञान गैरवापर कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी प्रशिक्षकाला राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. आरोपीने मुलीचे चित्रीकरणही केल्याचा आरोप असून त्याबाबत पोलीस तपास करीत आहेत.