राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी सुरु होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी दोन दिवसांपूर्वी विधिमंडळ परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रोहित पवार यांनी आंदोलन केलं. पण, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं. मात्र, एमआयडीसीला मिळणारी जमीन ही नीरव मोदीची असल्याचा दावा आमदार राम शिंदे यांनी विधानपरिषदेत केला आहे. यावर चौकशी केली जाईल, असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आतापर्यंत जामखेडची एमआयडीसी का होऊ शकली नाही? कर्जतच्या एमआयडीसीला कधी मंजूरी मिळणार? कोणत्या ठिकाणी ती केली जाणार?” असे सवालही राम शिंदे यांनी उपस्थित केले.

हेही वाचा : “आम्ही आठ माळे चढू शकत नाही”, ‘त्या’ प्रश्नावर भरत गोगावलेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

“कर्जत तालुक्यात शेतकऱ्यांच्या जमीन कवडीमोड दरात गुंतवणूकदारांनी विकत घेतल्या आहेत. त्यांची नावे नीरव मोदी, मनिषा कासोले, नयन गणेश अग्रवाल, कमलेश शाह, पंकज विनोद खन्ना, गणेश अग्रवाल अशी आहेत. मग, ही एमआयडीसी गुंतवणूकदार, शेतकरी की बेरोजगारांसाठी करायची?” असा प्रश्न राम शिंदे यांनी विचारला.

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे घरात बसून सरकार चालवलं”, बावनकुळेंच्या विधानाला दानवेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “मोदींनी…”

यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं, “कर्जतला एमआयडीसी करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. पण, तिथे नीरव मोदीने जमीन घेतल्याचं समोर आलं आहे. हा नीरव मोदी लंडनला पळून गेलेला की स्थानिक आहे, याची माहिती घेतली जाईल. तसेच, सर्व नावांची चौकशी करण्यात येईल.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karjat midc land neerav modi ram shinde in vidhanparishad rohit pawar ssa
Show comments