लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याचे आश्वासन देऊन अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी मुंबईतील एका ४७ वर्षीय व्यक्तीला अटक केली. आरोपी ऑर्गंडा अरविंद कुमार हा मूळचा कर्नाटकातील बेळगावचा असून, त्याला शहरातील साकीनाका परिसरातील करिअर समुपदेशन केंद्रातून ताब्यात घेण्यात आले. गेल्या वर्षी कर्नाटकमध्ये दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
आणखी वाचा-मुंबई : पाच तरूणींचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक
कुमारने तक्रारदाराकडून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पैसे घेतले होते. पण त्याने अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला नाही. तसेत तक्रारदारांचे पैसेही परत केले नाहीत. नीट पेपर फुटीप्रकरणाशी याप्रकरणाचा कोणताही संबंध नाही. कुमारने साकीनाका येथे एक समुपदेशन केंद्र उघडले आहे, जिथे कर्नाटक पोलिसांनी छापा टाकला आणि त्याला अटक केली.