जम्मू आणि काश्मिरचे धुमसते बर्फ गेल्या काही वर्षांमध्ये शांत झाले असल्याने चित्रपटसृष्टीला त्यांचे आवडते नंदनवन पुन्हा खुणावू लागले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा ओघ काश्मिरकडे वाढला असल्याची माहिती जम्मू-काश्मिरचे पर्यटन मंत्री गुलाम अहमद मीर यांनी दिली.
काश्मिरमध्ये पर्यटकांना जाणवणाऱ्या समस्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीलाही तिथे चित्रिकरण करताना येणाऱ्या अडचणी या विषयी गुलाम अहमद मीर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. १९८९ च्या दरम्यान जम्मू-काश्मिरमध्ये हिंसाचाराने थैमान घातले होते. त्याचा फार मोठा फटका तेथील पर्यटन व्यवसायाला बसला होता. आता मात्र तेथील परिस्थिती बदलत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा