कल्याण-डोंबिवली पालिकेतील ‘क’ प्रभागातील सुनील ऊर्फ बाटल्या या कर्मचाऱ्याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने सोमवारी मोक्काखाली अटक केल्याची घटना ताजी असतानाच, जवळ असलेल्या उल्हासनगर पालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना मंगळवारी सायंकाळी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका विकासकाकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले.
उल्हासनगर पालिकेचे आयुक्त बालाजी खतगावकर यांचे स्वीय साहय्यक गणेश शिंपी यांना वीस हजारांची तर मुकादम रिझवान शेमले यांना पन्नास हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. आपले बांधकाम तुटू नये म्हणून शिंपी व शेमले यांनी विकासकाकडे पैशांची मागणी केली होती. या घटनांमुळे अनधिकृत बांधकामे कशी पालिका कर्मचाऱ्यांची ईझी मनीची दुकाने झाली हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Story img Loader