कल्याण- डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांवर एका कर्मचाऱ्याने अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याने त्याचा निषेध म्हणून पालिका मुख्यालयात शुक्रवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पोलीस, पालिका आणि सरकारी परवानगी नसल्याने पालिकेचे झालेले आर्थिक नुकसान संबंधितांकडून वसूल करावे आणि संबंधित संघटनेवर कायदेशीर करावी, अशी मागणी अखिल भारतीय मजदूर युनियनने केली आहे. दरम्यान, संप पुकारणाऱ्या म्युनिसपल कामगार सेनेने पालिकेतील आजचा संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. साहाय्यक कामगार आयुक्त, नगरविकास प्रधान सचिव आणि पालिका आयुक्तांना या निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत, असे सफाई मजदूर संघटनेचे कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष सुनील गरूड यांनी सांगितले, मागासवर्गी य कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्याने त्याने गुन्हा दाखल केला आहे. त्यावरून कामबंद आंदोलन करणे योग्य नसल्याचे गरूड यांनी सांगितले.