नमिता धुरी
अनेक पदे रिक्त असल्याने अंतर्गत व्यवस्था खिळखिळी
मुंबई : २०० वर्षांचा इतिहास, विविध भाषांतील लाखो पुस्तके , ग्रंथसंवर्धन प्रयोगशाळा, हजारो प्राचीन नाणी आणि हस्तलिखिते, नियतकालिके व वृत्तपत्रांचे जुने अंक अशी साहित्यिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ची अंतर्गत व्यवस्था मनुष्यबळाअभावी खिळखिळी झाली आहे. येथील प्राचीन व अनमोल ठेव्याची योग्य देखभाल करण्यासाठी तज्ज्ञांची नेमणूक आजतागायत करण्यात आली नसल्याने हा संपूर्ण ऐवज कपाटबंदच ठेवण्यात आला आहे.
टाळेबंदीत उत्पन्नाचे स्रोत आटल्याने एशियाटिक सोसायटी अर्थसंकटात सापडली; मात्र त्याही आधीपासून सोसायटीला कर्मचाऱ्यांचे वेतन डोईजड झाल्याने अनेक पदांवर पूर्णवेळ नियुक्त्या झालेल्या नाहीत. ग्रंथपाल, साहाय्यक ग्रंथपाल या महत्त्वाच्या पदांवर गेल्या दशकभरापासून कं त्राटी नेमणुका होत होत्या. मात्र, टाळेबंदीपासून दोन्ही पदे पूर्णपणे रिक्त आहेत. नव्या पुस्तकोंची तपासणी, वर्गीकरण, क्रमांक देणे इत्यादी कामे करण्यासाठी ३ साहाय्यक (टेक्निकल असिस्टन्ट), १ लिपिक असतो. यापैकी लिपिकाचे पद रिक्त आहे. पुस्तकांच्या देखभालीसाठी आवश्यक ४ पदे, सुरक्षारक्षकोचे १ पद रिक्त आहे, अशी माहिती एशियाटिकच्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश रेड्डी यांनी दिली.
ग्रंथालयाकडे ११ हजार प्राचीन नाणी, ३ हजार हस्तलिखिते, दीड हजार नकाशे, १ लाख नियतकालिके आणि वृत्तपत्रांचे जुने अंक असा मौल्यवान ऐवज आहे. परंतु, संबंधित विषयांतील तज्ज्ञांची नेमणूक येथे कधीच करण्यात न‘एशियाटिक’चा अनमोल ठेवा मनुष्यबळाअभावी कपाटबंद आल्याने हे सारे वैभव लोकांसाठी खुले न होता कपाटबंद आहे. २०१२ साली सुरू झालेले नाण्यांची माहिती पुस्तिका (कॅ टलॉग) तयार करण्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. ‘नाण्यांची पाठवलेली छायाचित्रे तज्ज्ञ व्यक्तीने नापसंत के ली. पुन्हा छायाचित्रण के ले जाणार असताना टाळेबंदी सुरू झाली. त्यानंतर छायाचित्रकारांचे शुल्क वाढले. जुन्या शुल्कात काम क रण्यासाठी त्यांना राजी करण्यात आले आहे’, अशी माहिती सोसायटीच्या अध्यक्ष प्रा. विस्पी बालापोरिया यांनी दिली. ‘सोसायटीचे संग्रहालय १९२० साली ब्रिटिश सरकारने बंद के ले. प्राचीन वैभव लोकांकरिता खुले करण्यासाठी संग्रहालय उभारायचे असल्यास जागा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ सोसायटीकडे नाही’, असेही त्यांनी सांगितले.
ग्रंथपाल, साहाय्यक ग्रंथपाल पदांवर उच्चशिक्षित व्यक्तींची पूर्णवेळ नियुक्ती के ल्यास जास्त वेतन द्यावे लागते. टीआयएफआरमधून निवृत्त व्यक्तीची ग्रंथपाल म्हणून कं त्राटी नियुक्ती करण्यात आली. टाळेबंदीच्या सुरुवातीला त्यांचे कं त्राट संपले. ज्येष्ठ व्यक्तीला कमी वेतनात काम करायला लावणे योग्य न वाटल्याने त्यांना पुन्हा बोलावले नाही. पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळत नसल्याने त्यांचाही कं त्राटी नेमणुकांना विरोध होता. कमी वेतनामुळे साहाय्यक ग्रंथपालही निघून गेल्या. सुरक्षारक्षक अतिरिक्त वेळ काम करायला तयार असतात. सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध कर्मचाऱ्यांनी थोडा समजूतदारपणा दाखवला तर नव्या नेमणुकांची गरज नाही.
– प्रा. विस्पी बालापोरिया, अध्यक्ष, एशियाटिक सोसायटी