छगन भुजबळ यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीररित्या लढा देईल, असे शरद पवार यांनी सांगितले. भुजबळ यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सत्ताधारी पक्षाचे खासदार मी आणि मुख्यमंत्र्यांनी भुजबळ प्रकरणावर जातीने काम केल्याचे सांगतात. याचा अर्थ नक्की काय समजायचा ? ज्या पद्धतीने वृत्तवाहिन्यांवर भाजपचे प्रवक्ते बोलत आहेत, त्यावरुन भुजबळांवरील कारवाई राजकीय हेतून प्रेरित असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याचे यावेळी पवारांनी म्हटले. याशिवाय, महाराष्ट्र सदनाबाबतचे सर्व निर्णय एकट्या भुजबळांचे नव्हते. सर्व मंत्रिमंडळाचा या निर्णयप्रक्रियेत समावेश होता. कोणीही जर दिल्लीतली महाराष्ट्र सदनाची इमारत बघितली, तर त्याचे बांधकाम चांगल्या दर्जाचे असल्याचे लक्षात येईल, असेही पवारांनी सांगितले. आमचा पक्ष पूर्णपणे भुजबळ यांच्या पाठीशी असून आम्ही त्यांच्यासाठी कायदेशीर लढा लढू असे पवारांनी म्हटले.
महाराष्ट्र सदन तसेच इतर ११ प्रकरणांच्या घोटाळ्यातून तब्बल ८७० कोटी रुपये बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना ११ तासांच्या चौकशीनंतर सक्तवसुली महासंचालनालयाने काळापैसा प्रतिबंधक कायद्यान्वये काल रात्री अटक केली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला होता. भुजबळ यांच्या अटेकवरून कोणत्याही प्रकारची आंदोलने करू नका, असे पवार यांनी सांगितले होते.
भुजबळांसाठी आमचा पक्ष कायदेशीर लढा देईल- शरद पवार
महाराष्ट्र सदनाबाबतचे सर्व निर्णय एकट्या भुजबळांचे नव्हते.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:
First published on: 15-03-2016 at 09:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keep calm dont do any violence says sharad pawar