नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बिगर रहिवासी भागातील बाजारपेठा २४ तास खुल्या ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, अशी विनंती युवासेना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.


आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई येथील बिगर रहिवासी भागात असलेल्या बाजारपेठा नविन वर्षांच्या निमित्ताने २४ तास खुल्या ठेवण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात यावी. त्यामुळे लोकांना खुलेपणाने नव्या वर्षाच्या स्वागताचा आनंद घेता येईल. आपली ही आग्रहाची विनंती असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

 

Story img Loader