मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण कथित गैरव्यवहार प्रकरणात अटक केल्यानंतर मुंबईतील हवाला ऑपरेटर्सचा सहभाग उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या हवाला ऑपरेटर्सच्या माध्यमातून गोव्यातील निवडणुकीसाठी पैसे पाठवण्यात आल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. हा पैसा गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेपैकी सुमारे ४५ कोटी रुपयांच्या रोख रकमेचा वापर २०२१-२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत आपच्या निवडणूक प्रचारात केला गेल्याचा दावा ईडीकडून करण्यात येत आहे. ही रक्कम मद्य धोरणाच्या नावाखाली लाच म्हणून घेण्यात आली आहे.

हेही वाचा – विखे-पाटील यांच्या माफीनाम्यानंतरही भाजपमधील निष्ठावंतांची नाराजी कायम

हेही वाचा – मुलाच्या ‘कल्याणा’साठी मुख्यमंत्र्यांचे सारे काही

हेही वाचा – सांगलीच्या आखाड्यात पैलवान उतरल्याने भाजप आणि काँग्रेसची समीकरणे बदलली

ईडीच्या रिमांड अर्जानुसार, दिनेश अरोरा (माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे निकटवर्तीय) यांनी दिलेल्या जबाबात १ ऑक्टोबर २०२२ रोजी ३१ कोटी रुपयांच्या हवाला हस्तांतरणाचे काम पार पाडले. ईडीच्या म्हणण्यानुसार, आपने गोव्यातील निवडणूक प्रचारासाठी राजेश जोशी यांच्या मालकीच्या मेसर्स चॅरिऑट प्रोडक्शन मीडिया प्रायव्हेट लिमिटेडला गुंतवले होते. एक विक्रेता मेसर्स ग्रेस ॲडव्हर्टायझिंग आहे. त्यांचा कर्मचारी इस्लाम काझी याने ईडीला दिलेल्या जबाबात त्याला हवालाद्वारे ६ लाख २९ हजार रुपये मिळाल्याचे सांगितले. मुंबईतील मालाड येथील हवाला ऑपरेटरकडून पैसे घेतल्याचे सांगितले. मुंबईतील हवाला ऑपरेटर आनंद व्यास आणि अनिल पटेल यांनी अनुक्रमे चार लाख २५ हजार व दोन लाख ४५ हजार रुपये काझी यांना दिले. त्याचप्रमाणे आरोन डिसूझा यांना एकूण १३ लाख ६० हजार रुपयांपैकी ५ लाख ५० हजार रुपये रोख मिळाले, असे ईडीच्या रिमांड अर्जात नमूद करण्यात आले आहे. प्राप्तीकर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या पडताळणीत सुमारे ४५ कोटी रुपये हवालाद्वारे गोव्यात हस्तांतरित करण्यात आले होते.

Story img Loader