मुंबई : ‘जय क्रांती’ अशी घोषणा देत विधानसभेत आपल्या ओघवत्या शैलीने भल्याभल्यांना गारद करणाऱ्या केशवराव धोंडगे यांचा शताब्दीनिमित्त विधिमंडळात बुधवारी सत्कार करण्यात आला. उभय सभागृहांमधील भाषणे आणि हृद्य सत्काराने केशवराव भारावून गेले होते. शेकापचे ज्येष्ठ सदस्य आणि विधानसभा गाजविलेल्या १०२ वर्षीय केशवराव धोंडगे यांचा विधिमंडळात गौरव करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शताब्दीच्या वेळी त्यांचा सत्कार करण्याची योजना होती, पण करोनामुळे दोन वर्षे हा कार्यक्रम लांबणीवर पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी. केशवराव धोंडगे यांनी कष्टकरी, कामगार व दीनदुबळय़ांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयुष्य समर्पित केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांचा गौरव केला. केशवराव धोंडगे यांनी आपल्या कार्यातून महाराष्ट्र विधिमंडळाची परंपरा अधिक समृद्ध केली आहे, असे गौरवोद्गार राहुल नार्वेकर यांनी काढले. भाईंच्या भाषणात शब्दांच्या कोटय़ांची भरमार असायची.. औचित्याचा मुद्दा.. तारांकित प्रश्न.. लक्षवेधी ही सारी संसदीय आयुधे वापरून त्यांनी सरकारला जेरीस आणण्याचे काम केले.