ketki chitale oppose anil deshmukh bill application: राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० तारखेला मतदान पार पडणार असून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपा त्यातही खास करुन शिवसेना भाजपामध्ये या निवडणुकीमध्ये चांगलीच चढाओढ दिसून येत आहे. या निवडणुकीमधील प्रत्येक मत महत्वाचं ठरणार असल्यानेच राष्ट्रवादीकडून सध्या अटकेत असणाऱ्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. असं असतानाच आता अनिल देशमुख यांना मतदानासाठी जामीन मिळावा म्हणून केलेल्या याचिकेला अभिनेत्री केतकी चितळेने विरोध केलाय. केतकीने या जामीन याचिकेविरोधात याचिका दाखल केलीय.

नक्की वाचा >> शरद पवारांविरोधातील पोस्ट प्रकरण: “…मग पोलीस मला अटक कशी करु शकतात?”; पोलीस, सत्तेचा गैरवापर होत असल्याचा केतकी चितळेचा आरोप

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनुसार १०० कोटींच्या वसुली प्रकरणामध्ये सध्या अनिल देशमुख सीबीआयच्या ताब्यात आहेत. १० जून रोजी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी जामीन अर्ज केलेत. मात्र यापैकी अनिल देशमुखांच्या जामीन अर्जाला केतकी चितळेने विरोध केलाय. “अनिल देशमुखांना जामीन देऊ नये, त्यांना जामीन दिल्यास ते फरार होतील,” असा दावा केतकीने याचिकेद्वारे केल्याचं वृत्त ‘साम मराठी’ने दिलं आहे.

नक्की पाहा हे फोटो >> केतकी ब्राह्मण असल्याने तिला समर्थन देताय का?; तृप्ती देसाई म्हणाल्या, “पाठिंबा दिल्यास सगळे जातीवर…”

दरम्यान, दुसरीकडे वेगेवगेळ्या पोलीस स्थानाकांमधील तक्रारींच्या आधारे दाखल करुन घेण्यात आलेल्या सर्व एफआयआर बेकायदा असून माझी अटकही बेकायदा आहे, असा दावा अभिनेत्री केतकी चितळेनं केलाय. आपल्याला अटक करताना व्यक्तीस्वातंत्र्याच्या कायद्याचा भंग करण्यात आला असल्याने आपल्याला नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणीही केतकी चितळेनं न्यायालयाकडे याचिकेद्वारे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी कळवा पोलीस स्थानकाबरोबरच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पोलीस स्थानाकांमध्ये केतकीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.

नक्की वाचा >> शरद पवारांविरोधातील पोस्ट प्रकरणानंतर पहिल्यांदाच केतकी चितळेने केलं भाष्य; हसत म्हणाली, “त्या दिवशी…”

१५ मे पासून म्हणजेच मागील २३ दिवसांहून अधिक काळापासून केतकी अटकेत आहे. याच प्रकरणी तीने आता थेट मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. केतकी प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यात यावी यासाठी आज म्हणजेच मंगळवारी सात जून रोजी अर्जाद्वारे विनंती करण्यात येणार असल्याचं तिचे वकील घनश्याम उपाध्याय यांनी सांगितलंय.

Story img Loader