स्वदेशीला चालना देण्यासाठी निर्णय; अंमलबजावणीची तारीख निश्चित नाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आठवडय़ातील एक दिवस खादीचे कपडे घालण्यासाठी बंधनकारक केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच झालेल्या बैठकीत खादी वापराबाबत निर्णय घेण्यात आला. त्याबाबतची योग्य ती कार्यवाही करावी, असे मुख्य सचिवांच्या कार्यालयाने सर्व प्रशासकीय विभागांना कळविले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाबरोबरच देशी उद्योगांना चालना देण्यासाठी मेड इन इंडियाची घोषणा केली होती.

पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ऑक्टोबर २०१४ मध्ये त्यांनी पहिल्याच मन की बात कार्यक्रमात खादी उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवडय़ातून एक दिवस खादीचे कपडे घालावेत, असे आवाहन केले होते. त्याला एअर इंडिया व रेल्वे मंत्रालयाने पहिल्यांदा सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याच बरोबर खासगी उद्योगांमधूनही त्याचे स्वागत होत आहे. देशातील जे.के. सिमेंट या नामांकित कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना खादीचा गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने त्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात खादी व ग्रामोद्योग आयोगाकरिता ३४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवडय़ातून एक दिवस खादीचा वापर केला तर, या उद्योगाला चालना तर मिळेलच शिवाय त्यातून मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे, शिवाय ग्रामीण भागातील लहान विणकरांना त्याचा फायदा मिळणार आहे, असा सरकारचा दावा आहे.

* मंत्रालयात १८ मे २०१६ रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सर्व सचिवांची बैठक झाली. त्यात अनेक विषयांबरोबरच पंतप्रधान मोदी यांनी सूचित केल्याप्रमाणे आठवडय़ातील एक दिवस सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खादीचा वापर करावा, असा निर्णय घेण्यात आला.

*  या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून केली जाणार हे मात्र अजून निश्चित झालेले नाही. तसेच आठवडय़ातील नेमका कोणता दिवस खादीचे कपडे घालण्यासाठी निश्चित केला जाणार आहे, याबाबत अजून काही ठरलेले नाही. मात्र त्याबाबतची पुढील कार्यवाही करण्यासाठी मुख्य सचिवांच्या कार्यालयाकडून ३ जून रोजी सर्व विभागांना लेखी पत्रांद्वारे कळविण्यात आले आहे.