मुंबईः भारतातील विविध पोलीस दल, अर्ध सैन्य दल यांच्या अखिल भारतीय बँड स्पर्धेत नुकतेच प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या मुंबई पोलीस दलाच्या बॅण्डचा संगीतमय कार्यक्रम मुंबईकरांना मंत्रमुग्ध करणार आहे. या बॅण्डचे मुंबईतील विविध ठिकाणी सादरीकरण होणार आहे. या बॅण्डचा समाज माध्यमांवर मोठा चाहता वर्ग आहे.

श्रीवल्ली, बेला सियाओसारख्या गाण्यांच्या सादरीकरणाची ध्वनीचित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती. मुंबई पोलीस खाकी स्टुडिओतर्फे तीन आठवडे शनिवार, रविवार विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. मुंबईतील एनसीपीए जवळ शनिवारी झालेल्या सादरीकरणावेळी मोठ्याप्रमाणात मुंबईकर तेथे आले होते. आता २८ मे रोजी वांद्रा बॅण्ड स्टॅण्ड, ३ जून रोजी शिवाजी पार्क बॅण्डस्टॅण्ड, ४ जून माटुंगा फाईव्ह गार्डन या ठिकाणी सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत पोलीस बॅण्ड सादरीकरण करणार आहे.

हेही वाचा – मुंबई: पारबंदर सेतूचे काम पूर्ण; आता वाहनांसह साहित्याची वाहतूक शक्य

मुंबई पोलिसांच्या बॅण्ड विभाग प्रथम १९३६ मध्ये स्थापन करण्यात आला आणि त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईतील नायगाव पोलीस मैदानावर त्याची पहिली स्वतंत्र कामगिरी झाली. चंदीगड येथे झालेल्या २३ व्या अखिल भारतीय बँड स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्त्व करणाऱ्या मुंबई पोलीस बॅण्डने सुवर्ण पदक पटकावले होते. ब्रास बॅण्ड, पाईप बॅण्ड आणि ब्युगलर या तीन भागांमध्ये ही स्पर्धा झाली होती.

Story img Loader