घाटकोपर येथून आठ वर्षांच्या मुलाचेअपहरण करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी मंगळवारी कुर्ला येथून अटक केली. ११ फेब्रुवारीला त्याने हे अपहरण केले होते. पोलिसांनी यापूर्वीच अपहृत मुलाची सुटका केली होती. घाटकोपर येथे राहणाऱ्या फिरोज शेख (८) या मुलाचे घाटकोपरच्या पालिका शाळेसमोरून अपहरण करण्यात आले होते. फिरोजची आई नफिसा हिच्या परिचयाच्या समीर बागवान याने फिरोजचे अपहरण केले होते. फिरोजचा भाऊ शौकत बागवान एका प्रकरणात तुरुंगात होता. त्याला जामीन मिळवून दे, तरच मुलाची सुटका करेन, अशी धमकी त्याने दिली होती.
याप्रकरणी पोलिसांनी समीरचा तपास सुरू केला होता. पोलीस मागावर लागल्याने त्याने ३६ तासांनंतर म्हणजेच १३ फेब्रुवारी रोजी फिरोजला रिक्षात बसवून घरी पाठवून दिले होते. पंरतु तेव्हापासून तो फरारी होता. गुन्हे शाखेच्या युनिट ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक पाटील यांच्या पथकाने समीरच्या शोधासाठी सापळे लावले होते. मंगळवारी तो कुर्ला येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा