कफ परेड येथून एका चार वर्षीय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न पोलिसांच्या सर्तकतेमुळे शनिवारी फसला. पोलिसांनी अपहरणकर्ता अनिल थोरात याला अटक केली आहे.
 कफ परेड येथे राहणारे दिपेश नाईक हे शनिवारी सकाळी एका बँकेत कामानिमित्त गेले होते. त्यांच्या सोबत त्यांचा ४ वर्षांचा मुलगा तेजस होता. नाईक हे बँकेच्या कामात व्यस्त असताना तेजस बाहेर खेळत होता. त्याच वेळेस अनिल थोरात (२५) तेजसला आपल्या सोबत घेऊन गेला. काही अंतरावर असलेल्या कफ परेड पोलिसांनी थोरात आपल्याबरोबर तेजसला घेऊन जात असल्याचे पाहिले. काही वेळापूर्वी पोलिसांनी तेजसला त्याच्या वडिलांसोबत पाहिले होते. त्यांना संशय आल्याने त्यांनी थोरातची चौकशी सुरू केली. त्यावर तो समाधानकार उत्तर देऊ शकला नाही. दरम्यान, बँकेतून बाहेर आलेल्या नाईक यांनी मुलाची शोधाशोध सुरू केली. शोधत ते त्या ठिकाणी पोहोतले आणि अपहरणाचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी थोरातला अटक केली असून तो मुळचा यवतमाळचा आहे. त्याचे डिएनए नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
अपंग संस्थेच्या बसवर हल्ला
बोरीवलीच्या अंपग चिकित्सा व पुनर्वसन केंद्र या संस्थेच्या बसवर शनिवारी दुपारी अज्ञात व्यक्तीने हल्ला करुन नासधूस केली. बोरीवली पुर्वेच्या हनुमान टेकडी येथील संस्थेच्या आवारात शनिवारी दुपारी एका अज्ञात तरुणाने बसच्या काचा फोडून बस पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या वेळी बसचालक बसमध्येच होता. त्याने आरडाओरड करताच हल्लेखोर पसार झाला.

Story img Loader