चांगले जेवण केले नाही म्हणून पत्नीशी भांडण करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या शिवाजी गाताडेची जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली. विशेष म्हणजे आरोपीच्या आईवडिलांनी मुलाविरुद्ध दिलेली साक्षच न्यायालयाने त्याची शिक्षा कायम ठेवताना महत्त्वाची मानली.  
कोल्हापूर येथील रहिवाशी शिवाजी गाताडे याला पत्नी सुरेखा हिच्या खुनाच्या आरोपाखाली कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामाणी आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने त्याची शिक्षा कायम केली. जेवण चांगले करीत नसल्याच्या मुद्दय़ावरून गाताडे याने १२ नोव्हेंबर २००९ रोजी सुरेखाशी भांडण उकरून काढले. कडाक्याच्या भांडणानंतर त्याने काठीने सुरेखाच्या डोक्यात घाव केला आणि तिला तिथेच रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळून गेला. हे सगळे घडत असताना गाताडेचे आईवडील आणि दोन मुले दुसऱ्या खोलीत झोपली होती. त्यामुळे सुरेखाचा खून करणाऱ्यापूर्वी त्याने दोन खोल्यांमघील दरवाजा बंद केला होता. या प्रकरणी गाताडेच्या आईवडिलांनी दिलेला जबाब त्याला दोषी ठरविण्यात प्रामुख्याने ग्राह्य मानण्यात आला.

Story img Loader