मुंबईः माटुंगा येथील बालगृहात १६ वर्षीय गतीमंद मुलाच्या हत्येनंतर आता तेथील रक्षकाविरोधात मुलाच्या सुरक्षेसाठी योग्यती दक्षता न घेतल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बालगृहाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून रक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात केली होती. या मुलांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गतीमंद मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर!

चार अल्पवयीन मुलांनी १६ ऑगस्टला १६ वर्षीय गतीमंद मुलाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारले. त्यात तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. चार मुलाच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी या चार मुलांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात केली होती.

मृत मुलगा फार कमी बोलायचा व थोडासा गतीमंद होता. त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तेथे मृत मुलासह २३ आणखी मुले होती. या मुलांची काळजी घेण्यासाठी तसेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी बालगृहातील रक्षक गणेश पुजारी याच्यावर होती. पण बालकांच्या सुरक्षेची योग्यती दक्षता न घेतल्याचा ठपका ठेवत पुजारीविरोधात गुन्हा दाखल करणय्ात आला. डेविड ससुन बालगृहाच्या अधिक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे उपमुख्याधिकारी सतीश बनसोडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाल न्याय अधिनियमातर्गत गुन्हा दाखल केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Killing disabled children home custodian charged negligence security mumbai print news ysh