शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्रे गांधीनगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या अवैध बांधकामाविरोधात म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आज (मंगळवारी) हातोडा चालविण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच हे बांधकाम पाडण्यात आलं. दरम्यान, यावरून किरीट सोमय्यांनी परब यांना लक्ष्य आहे. वांद्रे येथील बांधकाम पाडलं, आता दापोलीतील रिसॉर्ट कधी पाडणार? असा प्रश्न सोमय्या यांनी अनिल परब यांना विचारला आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “…तर मी आणि शिवसेना गप्प बसणार नाही”, म्हणत अनिल परब यांचं किरीट सोमय्यांना खुलं आव्हान

काय म्हणाले किरीट सोमय्या?

“अनिल परब यांनी काही वर्षांपूर्वी वांद्रे पूर्वतील इमारत क्रमांक ५७-५८ मधल्या म्हाडाच्या जागेवर अनाधिकृत कार्यालय बांधलं होतं. काल ते कार्यालय तोडण्यात आलं. २०२१ मध्ये लोकायुक्तांच्या सुनावणीत हे कार्यालय पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर मातोश्रींचे दहा हातांचा आशीर्वाद असल्याने ही इमारत तोडायला थोडा उशीर झाला”, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली.

हेही वाचा – Anil Parab Office: “माझं किरीट सोमय्यांना आव्हान आहे की नारायण राणेंचं…”, अनिल परब यांची आगपाखड!

“रश्मी ठाकरेंच्या १९ बंगल्याची चौकशी सुरू झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ते बंगले स्वत:च पाडले. त्यावरून त्यांचे सचिव मिलिंद नार्वेकरांनी बोध घेतला. त्यांनीही स्वत:चा अनाधिकृत बंगला तोडला. अनिल परब यांच्या प्रकरणातही त्यांनी लोकायुक्तांच्या सुनावणीच्या दोन वर्षापर्यंत हे बांधकाम पाडले नाही. काही दिवसांपूर्वी म्हाडाने अनिल परब यांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर झालेल्या अंतिम सुनावणीनंतर म्हाडाचे अधिकारी ती इमारत पाडायला जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच अनिल परब यांनी ती इमारत स्वत:च पाडली”, असेही ते म्हणाले. तसेच जशी ही इमारत पाडली, तसे दापोलीतील रिसॉर्ट कसे पाडणार? असा प्रश्नही त्यांनी अनिल परब यांना विचारला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya criticized anil parab on bandra illegal building spb