भाजपाचे नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा संघर्ष होण्याची चिन्हं दिसत आहेत. सोमय्या हे आज एक प्रतीकात्मक हातोडा घेऊन दापोलीला रवाना होण्यासाठी निघालेत. दापोलीला जाण्याआधी त्यांनी पत्राकरांशी बोलताना राज्यातील नेते आणि ठाकरे सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणारच असा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे.

उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना ते अनिल परब यांना वाचवू शकत नाहीत असं सोमय्या म्हणालेत. “त्यांनी कितीही धडपड केली तरी ते अनिल परब यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणात ते वाचवू शकणार नाहीत. मी उद्धव ठाकरेंना चॅलेंज देतो. हिंमत असेल तर कोर्टात जाऊन सांगा, माझे मंत्री अनधिकृत बांधकाम करणार त्याला मी तोडू देणार नाही. आहे का उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत? ते इथे बसून पूडपूड करतात”, असा टोला सोमय्या यांनी लगावलाय.

Manoj Jarange On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर…”, मनोज जरांगेंची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!
BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले
Ajit Pawar
Ajit Pawar : “…तर माझ्या बरोबर कुणीही काम केलं नसतं”, अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : नाही तर ईडी, सीबीआय आहेतच!

यावेळी प्रताप सरनाईक यांच्यावरही सोमय्यांनी टीकास्त्र सोडले. महाराष्ट्राचे कॅबिनेट हे प्रताप सरनाईक यांचे अनधिकृत बांधकाम वाचण्यात मग्न आहे असं सांगताना, “सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामावर कॅबिनेट म्हणतं ये मेरा आदमी है माफ कर दो! अहो, ही महाराष्ट्राची साडेबारा कोटी जनता अनधिकृत बांधकाम चालू देणार नाही, मग ते उद्धव ठाकरेंच असो, प्रताप सरनाईकांचं असो किंवा अनिल परबांचं असो,” असं सोमय्या म्हणालेत

तसेच मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती यशवंत जाधव यांच्यावरही सोमय्यांनी टीकास्त्र सोडले. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्यावर टीकास्त्र सोडताना, “कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्यासाठी आयुक्त सांगतायत ही मेडिकल इमर्जन्सी होती, घोटाळेबाजांना पाठीशी घालणार असेल तर कारवाई त्यांच्यावरही होणार,” असं सोमय्या म्हणालेत. दापोलीच्या वाटेवर असताना सोमय्यांचं ऐरोली येथे आगमन झाले त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

Story img Loader