भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय रवींद्र वायकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र वायकर यांनी तुरुंगात जाण्याची तयारी करावी, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. रवींद्र वायकर यांनी मुंबई महापालिकेची दोन लाख वर्ग फूट जमिनीवर अनधिकृत कब्जा केला असून तिथे ५०० कोटींचं पंचतारांकित हॉटेल उभारलं जात आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवींद्र वायकर यानी मातोश्री स्पोर्टस ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींचा घोटाळा केला आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेले खुले क्रीडांगण व गार्डनसाठी असलेल्या जागेवर रवींद्र वायकर यांनी अनधिकृत कब्जा केला आहे. तिथे दोन लाख चौरस फुटांचं पंचतारांकित हॉटेल बांधण्याची सुरुवात केली आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात या जमिनीवर हे बांधकाम सुरू आहे. या हॉटेलची किंमत ५०० कोटी इतकी होत असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.

हेही वाचा- “संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही, त्यांच्या तोंडाला…”, गिरीश महाजनांची टोलेबाजी!

रवींद्र वायकर यांनी मुंबईतील जनतेसाठी आरक्षित असलेले क्रीडांगण व गार्डनच्या जागेवर त्यांच्या सुप्रीमो कंपनीद्वारे आधी सुप्रीमो बँक्वेट बांधलं. येथील बागेची रेडी रेकनरनुसार ४ कोटी किंमत होती. मात्र, वायकर यांनी हा भूखंड तीन लाख रुपयांना खरेदी केला. गेली अनेक वर्ष या जागेवर लग्न, पार्टी असे अनधिकृत व्यवहार रवींद्र वायकर करत आहेत, असा आरोपही सोमय्या यांनी केला.

हेही वाचा- “राणांच्या मदतीने फडणवीस बच्चू कडूंचा गेम करतायत”; सुषमा अंधारेंच्या टीकेवर बच्चू कडूंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “१५० कोटी…”

महानगरपालिका, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीव नगर विकास विभागाने या हॉटेलचं बांधकाम तत्काळ थांबवावं, अशी मागणीही किरीट सोमय्यांनी केली. सोमय्यांच्या या गंभीर आरोपानंतर उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय रवींद्र वायकरही तुरुगांत जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणावर महापालिका काय निर्णय घेणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya serious allegations on uddhav thackeray partner ravindra waikar rno news rmm