भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील कागदपत्रे बुधवारी नवी दिल्लीत प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या उच्चपदस्थांकडे सोपविली होती. दोन-चार आठवड्यांत याबाबत कार्यवाही अपेक्षित आहे आणि आता विदर्भातील एका मंत्र्याचा गैरव्यवहार बाहेर काढणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले होते. यामुळे सोमय्या यांनी आपल्याला घरातून अटक करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असल्याचा आरोप केला आहे.

याबद्दल त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत दिलेल्या पोस्टमध्ये सोमय्या म्हणतात, ठाकरे सरकारची दडपशाही, माझ्या घराखाली पोलिसांची गर्दी, माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी, हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश. मी मुलुंड निलम नगर हून ५.३० ला निघणार, आदी गिरगाव चौपाटी गणेश विसर्जन आणि तिथून ७.१५ वाजता CSMT स्टेशन महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला जाणार आहे.

आणखी वाचा -हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांचा १२७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार!

सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला असून मुश्रीफ यांनी १०० कोटी रुपयांचा दावा न्यायालयात सादर करण्याचा इशारा दिला होता. परिवहन मंत्री अनिल परब यांनीही सोमय्या यांना बदनामीबद्दल कायदेशीर नोटीस बजावली असून १०० कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. पण त्याला मी किंमत देत नसून सहा नेत्यांनी अशा नोटिसा दिल्या असल्याचे सोमय्या यांनी सांगितले होते.

हेही वाचा – १२७ कोटींचा भ्रष्टाचार आणि २७०० पानी पुरावे! किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ!

माझ्या मुलाला तुरुंगात पाठविण्याचा प्रयत्न झाला, पत्नी मेधा सोमय्यांच्या मागे चौकशी लावण्याचा प्रयत्न आघाडीच्या नेत्यांनी केला. पण मी त्याला घाबरत नसल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे. सोमय्या यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मुश्रीफ यांनी अब्रूनुकसानीचा १०० कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. याकामी २५ टक्के रक्कम दावापूर्व भरणे गरजेचे असते. ही रक्कम या दाव्यामध्ये २५ कोटी रुपये होते.

Story img Loader