छगन भुजबळ यांच्या मालमत्तेची पाहणी केल्याने भाजपा नेते किरीट सोमय्या यांना सांताक्रुझ पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली होती. मालमत्तेची पाहणी करताना करोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्यानं सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सोमय्या आज जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहिले. यावेळी त्यांनी त्यांच्यावर दाखल गुन्ह्यासह शिवसेना आणि विशेषत: संजय राऊतांकडून लावण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्याला तुरुंगात टाकू, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. आज त्यानुसार त्यांनी माझ्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू केलंय. घोटाळा करणारे संजय राऊत आणि त्यांचा पार्टनर सुजीत पाटकरविरोधात गुन्हा दाखल होत नाही, परंतु मी १०० कोटींची बेनामी संपत्ती मीडियाला दाखवली म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होतोय, असं सोमय्यांनी सुनावलं.

मुंबई पोलिसांनी समन्स पाठवल्याने किरीट सोमय्यांचा संताप; म्हणाले “ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांनी…”

“१४ लाख ८५ हजार २१४ कोटी रुपये लाटल्याचा आरोप माझ्यावर केला आहे. उद्या मी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात उत्तर देणार,” असं सोमय्यांनी सांगितलं. संजय राऊतांनी आज सकाळपासून तीन वेळा तुम्हाला शिवी दिली आहे, यावर तुमची प्रतिक्रिया काय?, असा प्रश्न विचारला असता सोमय्या म्हणाले की, “मला, माझ्या आईवडिलांना किंवा माझ्या कुटुंबाला सगळे शिवीगाळ करत असतात. त्यांच्याबद्दल अपशब्द बोलताहेत, यावेळी उद्धव ठाकरे काय करत आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार राज्याला लुटत असताना मी शांत बसणार नाही. शिवीगाळ सोडा, उद्धव ठाकरेंनी हजार वेळा जरी तुरुंगात टाकलं तरी मी घोटाळामुक्त महाराष्ट्र करून दाखवणार,” असं किरीट सोमय्या म्हणाले.  

पोलीस ठाण्यात जबाब नोंदवल्यावर किरीट सोमय्यांचा इशारा; म्हणाले, “उद्या पत्रकार परिषद घेऊन…”  

पुढे ते म्हणाले की, “मराठीत कोणती डिक्शनरी आहे का ते बघा आणि जेवढ्या शिव्या द्यायच्या आहेत, तेवढ्या एकदाच मला देऊन टाका. मराठीत उपलब्ध असलेल्या शिव्या सगळ्या एकदाच देऊन टाका, रोज माझ्या आईला संताप नको,” असे म्हणत सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला.

Story img Loader