गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. किरीट सोमय्यांनी संजय राऊतांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर संजय राऊतांनी किरीट सोमय्यांसाठी अपशब्द वापरले होते. त्यावरून संतापलेल्या किरीट सोमय्यांनी “मला एकदाच काय ते सर्व शिव्या देऊन टाका, रोज रोज मला, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या आईला शिव्या देऊ नका,” असं उत्तर दिलं होतं. दरम्यान, आज किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

संजय राऊतांना त्यांनी दिलेल्या *** या शिवीचा अर्थ कळतो का?, असा सवाल करत अर्थ कळत नसेल तर माझ्या बायको आणि आईला जाऊन विचारा, असं म्हणाले. संतापलेले किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, “माझी बायको आणि माझ्या सूनबाई दोघीही मराठी आहेत. अशा प्रकारची शिवी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंतर्फे संजय राऊत देतात. कारण मी त्यांची चोरी लबाडी लोकांसमोर आणली. त्यांचे घोटाळे लोकांसमोर आणले म्हणून मला शिवीगाळ करत आहेत,” असा आरोप सोमय्यांनी केला.

Sudesh Bhosale
सुदेश भोसलेंनी सांगितलं आशा भोसले यांच्याबरोबरचं नातं; किस्सा सांगत म्हणाले, “तेव्हापासून मी त्यांना आई…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
b praak and ranveer allahbadiya
“सनातनी धर्माचा प्रचार…”, प्रसिद्ध गायकाने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये जाण्यास दिला नकार; म्हणाला, “घाणेरडे विचार…”
Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”

“१९ बंगल्यांचा घोटाळा उघडकीस आणल्यानं मला जोड्याने मारण्याची भाषा केली जाते. परंतु स्वतः मुख्यमंत्री १२ कोटी जनतेची फसवणूक करत आहे, त्याचं काय, असा सवाल सोमय्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणावर एकही वाक्य बोलण्याची हिंमत मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या एकही नेत्यामध्ये नाही,” अशी टीका सोमय्या यांनी केली. यावेळी मातोश्रीवरून फोन आल्यानंतर कोर्लईचा सरपंच जबाब बदलत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Story img Loader