मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची एसआरए घोटाळ्याप्रकरणी दादर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनीदेखील त्यांच्यावर या घोटाळ्याप्रकरणी आरोप केले आहेत. दरम्यान, या आरोपानंतर आता पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधातील नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला गेला, ते भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले. हा बेगडीपणा मला कधीही जमलेला नाही, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत. त्या मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होत्या.

हेही वाचा >>>> सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय; म्हणाले, “लवकरच राज्यात…”

दरवेळी किरीट सोमय्या प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. या प्रकरणाबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. या प्रकरणाशी संबंध असलेल्या विभागानेही यामध्ये माझा संबंध नसल्याचे लिहून दिलेले आहे. पण तरीदेखील मी सीईओ, मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, असं सोमय्या म्हणत आहेत. दबावतंत्राने आवाज बंद करण्याचा प्रयत्न त्यांनी कायम ठेवला आहे. सोमय्या हे एकाच गोष्टीला घेऊन वारंवार आरोप करत आहेत. विरोधातील नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला गेला, ते भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले. हा बेगडीपणा मला कधीही जमलेला नाही, असे पेडणेकर म्हणाल्या.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>>>किशोरी पेडणेकरांची पोलिसांकडून चौकशी, किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर दादर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये

मी मागील कित्येक वर्षांपासून वरळी विधानसभेतच राहते. माझ्या आयुष्याचे पुस्तक उघडे आहे. माझं सासर आणि माहेर हे वरळी विधानसभा मतदारसंघातच आहे. मी गोमातानगरमध्ये २०१७ साली फॉर्म भरला होता. तेव्हा मी केअर ऑफ म्हणून हा फॉर्म भरलेला होता. पण कारण नसताना जेरीस आणण्याचा डाव असेल तर मी त्याला बळी पडणार नाही, असेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.