राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना, सीबीआय तपास करत असलेल्या भ्रष्टाचार आणि वसुली प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अनिल देशमुखांवर जसलोक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने हा जामीन मंजूर केला आहे. १०० कोटी वसुली प्रकरणामध्ये देशमुखांवर खोटे आरोप केल्याचा युक्तीवाद देशमुख यांच्या वकिलांनी केला आहे. न्यायालयाच्या निकालावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना(ठाकरे गट) नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर यांनीही प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना टोलाही लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “आजही आपल्या देशात लोकाशाहीने, संविधानाने, न्यायीक बाजू ही आजही सत्यमेव जयतेच्या बाजूने आहे. खूप आरोप त्यांच्यावर (अनिल देशमुख) झाले, आज त्यांना जामीन मिळालेला आहे. आनंदाची बाब आहे कारण, न्यायालयाच्या लढाया जिंकत असताना हळूहळू सगळ्याच गोष्टी व्यवस्थितपणे बाहेर येत असतात. खूप महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या बाबतीत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत ही आनंदाची बाब आहे.”

हेही वाचा – १०० कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना जामीन मंजूर

याशिवाय, “न्यायालयाच्या कामकाजात आपण काही बोलणं उचित होणार नाही. न्यायालयाने ती बाजू समजून घेऊन कदाचित ते दहा दिवस वाढवले असतील. त्यानंतर त्यांना कायमचा जामीन मिळेल अशी आशा करूया.” असंही पेडणेकर यांनी म्हटलं.

याचबरोबर, “अनेक घोटाळे आपण पाहीले, त्यानंतर मात्र त्यामधून काही निष्पन्न झालं नाही. अनेक घोटाळ्यांवरती किरीट सोमय्या जसे बोलतात आणि नंतर मात्र सगळे वॉशिंग मशीनमध्ये गेले की शुद्ध होतात. ” अस म्हणत किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kishori pednekars criticism of kirit somaiya after anil deshmukh was granted bail msr