मुंबई : नायर रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना जेवण पुरवण्याची जबाबदारी रुग्णालयाच्या स्वयंपाकगृहावर आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून नायर रुग्णालातील स्वयंपाकगृहामधील कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपचारार्थ रुग्णालयात दाखल रुग्णांना वेळेवर जेवण पुरवण्यात कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> ८४२ रहिवाशांना घराची हमी; बीडीडीवासीयांना घरभाडे वा संक्रमण शिबिरातील गाळ्यांचे वितरण

pune video
वाढीव पुणेकर! एवढे उत्साही लोक फक्त पुण्यातच भेटतात, पठ्ठ्याने कारला केली लायटिंग, Video Viral
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
What is the right time to have breakfast
सकाळी ८ ते १० नाही, तर नाश्त्याची ही वेळसुद्धा ठरू शकते फायदेशीर? वाचा तज्ज्ञांचे मत…
job Pune Municipal Corporation, people left job Pune Municipal Corporation, Pune Municipal Corporation news,
पुणे : पालिकेच्या नोकरीला ७१ जणांनी केला रामराम, नक्की काय आहे प्रकार !
st employees Diwali gift
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, उचल नाही
gig workers pune
गिग कामगारांचा उद्या संप! स्विगी, झोमॅटोसह इतर ऑनलाइन डिलिव्हरी सेवा ठप्प होणार
Thieves stole cash from women bags on Lakshmi Street crime news Pune news
लक्ष्मी रस्त्यावर चोरट्यांचा सुळसुळाट; महिलांच्या पिशवीतून रोकड चोरी
Snehal Tarde
“तिथल्या स्वयंपाकघराचा वास….”, स्नेहल तरडे यांनी सांगितले की, शहरातल्या घरात चूल का तयार केली?

नायर रुग्णालयामध्ये दररोज साधारण चार ते पाच हजार रुग्ण उपचारासाठी बाह्यरुग्ण विभागात येत असतात. त्यातील काही रुग्णांना आंतररुग्ण विभागात दाखल करण्यात येते. या रुग्णांना जेवण पुरवण्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची आहे. रुग्णालयातील स्वयंपाकगृहातून रुग्णांना सकाळची न्याहारी, दुपारी व रात्री जेवण पुरविण्यात येते. नायर रुग्णालयात दररोज अंदाजे एक हजार रुग्णांचे जेवण बनविण्यात येते. सकाळी न्याहारीसाठी ५०० चपात्या किंवा पाव, दुध किंवा अंडी, तसेच दुपारी व रात्रीच्या जेवणासाठी चपाती, भात, डाळ, भाजी असे जेवण दिले जाते. मात्र रुग्णांसाठी जेवण बनवणारे आवश्यक कर्मचारीच स्वयंपाकगृहात नाहीत. स्वयंपाकगृहामध्ये रुग्णांना जेवण बनविण्यासाठी १७ स्वयंपाक्यांची आवश्यक आहेत. मात्र सध्या केवळ पाच कर्मचारी कार्यरत असून स्वयंपाक्यांची १२ पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर त्यांना मदत करणाऱ्या सहाय्यक स्वयपांक्यांची १० पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांना जेवण पुरवण्यामध्ये या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांना डाळ, भात, चपात्या, भाजी असे पूर्ण जेवण उपलब्ध करण्यात या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा >>> मुंबई : पश्चिम रेल्वेवरील गारेगार प्रवास निर्विघ्न

रुग्णांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांवर पडणार कामाचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी तातडीने कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याकडे केली आहे.

२२ पदे रिक्त नायर रुग्णालयात दररोज अंदाजे एक हजार रुग्णांचे जेवण बनविण्यात येते. सकाळी न्याहारीसाठी ५०० चपात्या किंवा पाव, दूध किंवा अंडी, तसेच दुपारी व रात्रीच्या जेवणासाठी चपाती, भात, डाळ, भाजी असे जेवण दिले जाते. मात्र रुग्णांसाठी जेवण बनवणारे आवश्यक कर्मचारीच स्वयंपाकगृहात नाहीत. स्वयंपाकगृहामध्ये रुग्णांना जेवण बनविण्यासाठी १७ स्वयंपाक्यांची आवश्यक आहेत. मात्र सध्या केवळ पाच कर्मचारी कार्यरत असून स्वयंपाक्यांची १२ पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर त्यांना मदत करणाऱ्या सहाय्यक स्वयंपाक्यांची १० पदे रिक्त आहेत.